मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम सुरू
By admin | Published: October 19, 2016 02:21 AM2016-10-19T02:21:11+5:302016-10-19T02:21:11+5:30
भारत निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार १ जानेवारी २०१७ या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त
नोंदी अद्यावत होणार
गडचिरोली : भारत निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार १ जानेवारी २०१७ या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाअंतर्गत २१ आॅक्टोबर २०१६ पर्यंत मतदारांकडून नमूना ६, ७ व ८ - अ प्राप्त करून घेण्यास मुदतवाढ दिलेली आहे. जिल्ह्यातील सर्व जनतेनी आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करून घ्यावी, मतदार यादीवर काही आक्षेप व हरकती असतील, त्यांनी आक्षेप, हरकती, नाव समाविष्ट करणे, वगळणे, तपशीलवार दुरूस्ती, नाव स्थलांतरित करणे, यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज पुराव्यांसह संबंधित मतदान केंद्रांचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी/तहसील कार्यालय/ उपविभागीय अधिकारी कार्यालयात सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मतदार यादीचे एका भागातून दुसऱ्या भागात नाव स्थलांतरित करण्यासाठी आवश्यक पुराव्यासह नमूना आठ अ भरून द्यावा, ज्यांचे फोटो मतदार यादीत नाही, अशा मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे नमूना आठसह फोटो सादर करावा, जिल्ह्यातील सर्व जनतेने मतदार यादीतील नोंदणी अद्यावत करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गडचिरोली यांनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)