गेदा येथील स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:44 AM2021-09-09T04:44:32+5:302021-09-09T04:44:32+5:30

याबाबत बुधवारला तहसीलदार तक्रार देण्यात आली. यात म्हटले आहे की, स्वस्त धान्य दुकानदार प्रकाश दोंतुलवार यांच्याकडे मोफत मिळणारे ऑगस्ट ...

Revoke the license of the cheap grain shopkeeper at Geda | गेदा येथील स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना रद्द करा

गेदा येथील स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना रद्द करा

googlenewsNext

याबाबत बुधवारला तहसीलदार तक्रार देण्यात आली. यात म्हटले आहे की, स्वस्त धान्य दुकानदार प्रकाश दोंतुलवार यांच्याकडे मोफत मिळणारे ऑगस्ट महिन्याच्या धान्याची मागणी गेदा येथील रेशनकार्डधारक प्रदीप लटारे, श्रीकांत शेट्टी यांनी केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर देत. तुम्ही मोफत धान्य नेले असे सांगुन कार्डावर राशन कार्डावर खोट्या नोंदी करुन घेतल्या. याला रेशनकार्डधारकनी विरोध केला असता. मोफत धान्य आलेच नसल्यांचे सागितले. अवघ्या पंधरा मिनिटात दोन्ही रेशनकार्डधारकांच्या उपस्थितीत एटापल्ली येथील एका व्यक्तीला एक कट्टा गहू दिले. यांचा चित्रफित मोबाईलवर रेशनकार्डधारकांनी घेतला.

याच पुरावाच्या आधारावर दोंतुलवार यांची तक्रार तहसीलदारांकडे करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रमेश वैरागडे यांचेसह तक्रारकर्ते प्रदीप लटारे, श्रीकांन्त शेट्टे, आनंद भांडेकर व गावकरी हजर होते. तक्रार नायब तहसीलदार जें. जी. काडवाजीवार यांच्याकडे देण्यात आली. तालुक्यात अनेक स्वस्त दुकानदारांच्या तक्रारी येत असुन तक्रारींकडे पुरवठा निरीक्षकांचे दुर्लक्ष असल्याचा आराेप रेशनकार्डधारकांनी केला आहे.

Web Title: Revoke the license of the cheap grain shopkeeper at Geda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.