ऋषी पोरतेट अपघात जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 01:02 AM2018-03-29T01:02:27+5:302018-03-29T01:02:27+5:30

Rishi Poritat injured in the accident | ऋषी पोरतेट अपघात जखमी

ऋषी पोरतेट अपघात जखमी

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषद सदस्य : चारचाकी वाहनाची ट्रकला धडक

ऑनलाईन लोकमत
मुलचेरा : बांबू भरून मार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला जिमलगट्टा-पेठा क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य ऋषी पोरतेट यांच्या चारचाकी वाहनाने धडक दिली. या धडकेत ऋषी पोरतेट व त्यांच्या सोबत असलेले सुरेश रसपल्ली हे जखमी झाले आहेत. सदर अपघात लगाम गावाजवळ रात्री ९ वाजताच्या सुमारास घडला.
ऋषी पोरतेट हे एमएच-३३-व्ही-०५४४ या क्रमांकाच्या बोलोरे वाहनाने बोरीवरून लगामकडे येत होते. दरम्यान याच मार्गावर एमडब्ल्यूवाय-२६५८ क्रमांकाचा बांबू भरलेला ट्रक उभा होता. या ट्रकला बोलोरेने धडक दिली. यामुळे ऋषी पोरतेट यांच्या डोक्याला मार लागला. लगाम येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.

Web Title: Rishi Poritat injured in the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात