डिझेलच्या दरवाढीने घर झाले महाग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2021 05:00 AM2021-10-24T05:00:00+5:302021-10-24T05:00:38+5:30
सप्टेंबर महिन्यापूर्वी १२-१० एमएमचा लाेखंड प्रति क्विंटल ५ हजार ५०० रुपये दराने विकला जात हाेता. आता हा दर क्विंटलमागे ६ हजार २०० रुपये पाेहाेचला आहे. ८ एमएमचा लाेखंडासाठी एका क्विंटला सध्या ६ हजार ३०० रुपये माेजावे लागत आहेत. काही दुकानांमध्ये लाेखंड ६ हजारांवर विकला जात आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : सरकारच्या वतीने डिझेल व काेळसाच्या दरात वाढ करण्यात आल्याने काेणत्याही वस्तूचा वाहतूक व आयात खर्चामध्ये वाढ झाली आहे. परिणामी, घर बांधकामाचे साहित्य महाग झाल्याने घरमालकांचे आर्थिक बजेट काेलमडले आहे. विशेष म्हणजे, महिनाभराच्या कालावधीत बांधकाम साहित्यामध्ये ३० ते ३५ टक्यांची वाढ झाली आहे.
घराचे बांधकाम करण्यासाठी सिमेंट, लाेखंड, विटा, रेती, गिट्टी आदी साहित्याची आवश्यकता असते. शिवाय फिनिशिंगच्या वेळी दरवाजे, खिडक्या, पेंट तसेच काच व विविध प्रकारच्या साहित्याची गरज भासते. त्यानंतरच घराचे काम पूर्ण हाेऊन घर राहण्यायाेग्य तयार हाेते. महागाईने घराच्या किमती वाढल्या आहेत.
सिमेंट ८० रूपयांनी महाग
- सप्टेंबर महिन्यात सिमेंटचे भाव आवाक्यामध्ये हाेते. मात्र, आता ऑक्टाेबर महिन्यात सिमेंटचे दर दाेन ते तीनदा वाढले. सद्य:स्थितीत इमारत साहित्याच्या काही दुकानांमध्ये सिमेंट प्रति बॅग ३८० रुपये तर काही दुकानांमध्ये ४०० रुपये दराने विकल्या जात आहे. १५ दिवसांत सिमेंटचे दर ५० रुपयांनी वाढले. तर महिनाभरात सिमेंटच्या बॅगची किंमत ८० रुपयांनी वाढली.
असे आहेत लाेखंडाचे दर
सप्टेंबर महिन्यापूर्वी १२-१० एमएमचा लाेखंड प्रति क्विंटल ५ हजार ५०० रुपये दराने विकला जात हाेता. आता हा दर क्विंटलमागे ६ हजार २०० रुपये पाेहाेचला आहे. ८ एमएमचा लाेखंडासाठी एका क्विंटला सध्या ६ हजार ३०० रुपये माेजावे लागत आहेत. काही दुकानांमध्ये लाेखंड ६ हजारांवर विकला जात आहे.
पुन्हा निर्माण झाला रेतीचा तुटवडा
शासनाच्या जाचक अटीमुळे गडचिराेली जिल्ह्यातील रेतीघाटाची लिलाव प्रक्रिया रखडली आहे. काही महिन्यांपूर्वी फार कमी रेती घाटांचे लिलाव करण्यात आले. अनेक विक्रेत्यांनी रेतीची साठवणूक करून ठेवली. आता रेतीचा तुटवडा निर्माण झाला आहे. रेती नसल्याचे अनेक पुरवठादार ग्राहकांना सांगत आहेत.
फ्लॅटही गेले आवाक्याबाहेर
- पूर्वी घराममाेर अंगण, संरक्षण भिंत त्याच्या आतमध्ये विविध प्रकारचे फुलझाडे असे घराचे चित्र दिसत हाेते. मात्र, बदलत्या काळानुसार व महागाईच्या युगात अनेक जण रेडिमेड घर अर्थात फ्लॅट खरेदी करण्यावर भर देत आहेत. टूबीएचके, थ्रीबीएचके व तत्सम प्रकारचे फ्लॅट अनेक डेव्हलपर्सने गडचिराेली शहरात विकसित केले आहेत. २५ लाखांपासून तर ३५ लाखांपर्यंत फ्लॅटच्या किमती आहेत.
- काेराेना संसर्गाच्या कालावधीमध्ये फ्लॅटचे दर स्थिर हाेते. कारण त्यावेळी अनेकांची आर्थिक परिस्थिती बेताची हाेती. आता काेराेना संपल्यानंतर उद्याेगधंदे सुरू झाले. बाजारपेठेत उलाढाल वाढली. तसेच बांधकाम साहित्याच्या दरात वाढल्याने फ्लॅटच्या किमती दाेन लाखांनी वाढल्या आहेत.
काेळसा व डिझेलच्या दरात वाढ झाल्याने लाेखंड, सिमेंट, गिट्टी व तत्सम बांधकाम साहित्याच्या आयात व निर्यातीचा खर्च वाढला आहे. हा खर्च भरून काढण्यासाठी बांधकाम साहित्याच्या दरात वाढ करण्यात आली आहे. गेल्या महिनाभराच्या कालावधीत बांधकाम साहित्याचे दर बरेच वाढले. अनेकांचे बजेट दाेन ते तीन लाखांनी वाढले आहेत.
- संजय बारापात्रे, दुकानदार