पेट्राेल-डिझेलच्या दरवाढीने नांगरणीचे भाव वधारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:27 AM2021-05-28T04:27:06+5:302021-05-28T04:27:06+5:30
अनेक शेतकरी ट्रॅक्टर व पाॅवर टिलरच्या माध्यमातून शेती करीत आहेत. आधुनिक शेतीसाठी डिझेल-पेट्रोल वापरल्याने खर्च जादा व वेळ कमी ...
अनेक शेतकरी ट्रॅक्टर व पाॅवर टिलरच्या माध्यमातून शेती करीत आहेत. आधुनिक शेतीसाठी डिझेल-पेट्रोल वापरल्याने खर्च जादा व वेळ कमी लागत असल्याने शेतकऱ्यांचा कल आधुनिक तंत्राकडे आहे. मागील वर्षी डिझेलचे दर प्रति लिटरला ७० रुपयांच्या आसपास हाेते, मात्र यंदा ९० रुपयांपर्यंत पाेहाेचले आहेत, तर मागील वर्षी जवळपास प्रतितास नांगरणीचे दर ७०० रुपये ट्रॅक्टरभाडे हाेते. परंतु आता ७५० ते ८०० रुपये प्रतितास भाडे नांगरणीचा खर्च वाढला आहे. डिझेलमधील दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे शेती कशाप्रकारे कसावी? असा सवाल शेतकरी करीत आहेत. शेतकऱ्यांचा विचार करून शासनाने डिझेलचे दर कमी करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
काेट
मागील वर्षी ट्रॅक्टरद्वारे नांगरणीचे दर प्रतितास ६०० ते ७०० रुपये हाेते. मात्र यावर्षी इंधन दरवाढीमुळे ट्रॅक्टरमालकांनी प्रतितास ७५० ते ८०० रुपये केले आहे. त्यामुळे यावर्षी पीकलागवड खर्च वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना लागणारा अतिरिक्त खर्च न परवडणारा आहे. एक तर शासन धानाला याेग्य भाव देत नाही व धानाचा बाेनसही अद्याप मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी खर्च भागवायचा कसा? घडाईपेक्षा मडाई जात हाेत आहे.
श्रीरंग मशाखेत्री, शेतकरी भेंडाळा