वाकलेल्या वीज खांबामुळे अपघाताचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:35 AM2021-04-06T04:35:49+5:302021-04-06T04:35:49+5:30
धानाेरा : तालुक्यातील रांगी-निमगाव मार्गावर चार महिन्यांपूर्वी वादळामुळे विद्युत तारांवर झाड पडले. परिणामी तारा तुटून लाेखंडी वीज खांब वाकला. ...
धानाेरा : तालुक्यातील रांगी-निमगाव मार्गावर चार महिन्यांपूर्वी वादळामुळे विद्युत तारांवर झाड पडले. परिणामी तारा तुटून लाेखंडी वीज खांब वाकला. या ठिकाणी नवीन खांब व तारा बदलविण्यात आले. मात्र, वाकलेला जुना वीज खांब तसाच ठेवण्यात आला. शिवाय या मार्गावर गिट्टी टाकण्यात आली आहे. त्यामुळे येथे अपघाताचा धाेका निर्माण झाला आहे.
रागी-धानोरा मार्गाचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू असल्याने रस्ता खोदून रोडवर गिट्टी टाकून ठेवण्यात आली आहे. धानोरावरून रांगीकडे ये-जा करणारे प्रवासी याच मार्गाचा वापर करतात. परिणामी या मार्गावर वर्दळ वाढली आहे. या मार्गावर खांब वाकून राेडवर आल्याने रात्रीच्या वेळेस खांब दिसत नाही. परिणामी अपघाताची दाट शक्यता आहे. रस्त्यावरील जुना वीज खांब हटविण्यात यावे, यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाला अर्ज देण्यात आले. मात्र प्रशासनाने कार्यवाहीकडे दुर्लक्ष केले आहे. संबंधित विभागाने रस्त्यावरील वीज खांब हटवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.