‘त्या’ विद्युत खांबामुळे अपघाताचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:38 AM2021-02-11T04:38:16+5:302021-02-11T04:38:16+5:30
पशुपालन योजनांची जनजागृती करा भामरागड : पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुपालकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र बहुतांश पशुपालकांना या योजनांची ...
पशुपालन योजनांची जनजागृती करा
भामरागड : पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुपालकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र बहुतांश पशुपालकांना या योजनांची माहिती नसल्याने ते या योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. पशुसंवर्धन विभागाने या योजनांची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. पशुपालन हा शेतीला चांगला जोडधंदा आहे. त्यामुळे या योजनांची जनजागृती करावी.
चपराळा पर्यटनस्थळी सुविधांचा अभाव
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील श्रीक्षेत्र प्रशांतधाम चपराळा येथे दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते; मात्र याठिकाणी सोयीसुविधांचा अभाव असल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या स्थळाचा विकास करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करा
गडचिरोली : तालुक्यात अनेक दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारक दारू प्राशन करून वाहन चालवितात. याकडे वाहतूक तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी आहे.
लिंक फेलमुळे कामे होताहेत प्रभावित
अहेरी : केंद्र शासनाने विविध योजनेची प्रक्रिया व प्रशासकीय कामे ऑनलाईन केली आहेत. त्यामुळे योजनेचे अनेक लाभार्थी तसेच कर्मचारीसुद्धा बरीच कामे ऑनलाईन स्वरूपात करीत आहेत; मात्र गेल्या काही दिवसांपासून बीएसएनएल तसेच खासगी कंपन्यांची लिंक फेल असल्याने ऑनलाईन कामे प्रभावित होत आहेत.
गतिरोधक उभारा
चामोर्शी : मूल-चामोर्शी मार्गावर असलेल्या भेंडाळा येथील बसस्थानकावर गतिरोधक उभारण्यात यावे, अशी मागणी नागरिक व प्रवाशांकडून केली जात आहे. चामोर्शी-मूल मार्गे तसेच आष्टीकडे जाणारी शेकडो वाहने भरधाव वेगाने जातात.
हाडकुळ्या पशुधनाला ग्राहक मिळेना
अहेरी : जिल्ह्यात पशुधनाची संख्या मोठी आहे; मात्र अनेकांकडे हाडकुळ्या गायी व बैल आहेत. या पशुधनाची व्यवस्था सांभाळताना शेतकऱ्यांना त्रास होत आहे. पशुधन विकण्याच्या तयारीत आहे.
ग्रामीण भागात कोंबड बाजार सुरू
गडचिरोली : काेराेना संसर्गामुळे मंडई व नाट्य प्रयोग सुरू झाले नसले तरी अनेक ठिकाणी कोंबड बाजार भरविला जात आहे. त्यामुळे अनेक युवक दारूच्या आहारी जात आहेत. काेंबड बाजारावर सट्टा लावला जात असून याकडे पाेलिसांचे दुर्लक्ष हाेत आहे. दर रविवार, बुधवार व शुक्रवारी अनेक ठिकाणी काेंबड बाजार भरविले जात आहेत.
ग्रामीण भागात पेट्रोलची अवैध विक्री
वैरागड : आरमाेरी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात जादा दराने पेट्रोलची विक्री सुरू आहे. खेड्यातील काही किराणा दुकानदार विक्रीसाठी पेट्रोलपंपावरून पेट्राेल नेतात. गावात अधिक दराने पेट्राेलची विक्री केली जात आहे. जवळपास पेट्राेलपंप नसल्याने नागरिक गरजेपुरते पेट्राेल खरेदी करतात.
पाणी टाक्यांना कुंपण करण्याची गरज
गडचिरोली : पाण्याचा पुरवठा करण्यासाठी गावांमध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे, परंतु या टाकीच्या सुरक्षेसाठी प्रशासन गंभीर नसल्याचे दिसते. प्रत्येक पाणी टाकीला कुंपण करून पाणी टाकीच्या क्षेत्रात प्रतिबंध घालणे आवश्यक आहे.
विटा बनविण्याच्या कामास वेग
देसाईगंज : देसाईगंज तालुक्यात मोठ्या प्रमाणात विटांची निर्मिती केली जाते. विटांची मागणी वाढली असल्याने विटा बनविण्याच्या कामास वेग आला आहे. अनेकांना येथून राेजगार मिळाला आहे. पुन्हा चार महिने विटा व्यवसाय चालणार आहे.
जिल्हाभरात खर्राची खुलेआम विक्री
सिराेंचा : लाॅकडाऊनच्या कालावधीत खर्रा विक्रीवर बंदी घालण्यात आली हाेती. लाॅकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर आता ग्रामीण व दुर्गम भागात खुलेआम खर्राची विक्री केली जात आहे.
एमआयडीसीतील अनेक भूखंड रिकामे
गडचिरोली : गडचिरोली शहराजवळची शेकडो एकर जागा आहे. एमआयडीसीसाठी राखीव करण्यात आली आहे. या परिसरात पाणी, वीज यासारख्या सुविधाही राज्य शासनाच्या वतीने उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र बहुतांश भूखंड रिकामेच आहेत. काही भूखंडांवर उद्योग स्थापन केले नाहीत. याचा परिणाम रोजगारावर होत आहे.
रोहित्रांचा धोका वाढला
गडचिरोली : ग्रामीण तसेच शहरातील बहुतांश शासकीय इमारतीच्या परिसरात विद्युत रोहित्र आहेत. बहुतांश रोहित्र उघडेच आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या एखाद्या नागरिकाचा स्पर्श होऊन मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महावितरण कंपनीने लक्ष घालून राेहित्र हटवावे, अशी मागणी हाेत आहे.