धोका पत्करून वीज केली सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 01:43 AM2017-09-23T01:43:07+5:302017-09-23T01:43:21+5:30

वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर कर्मचारी परिस्थितीनुसार वीज दुरूस्तीच्या कामाला लागतात. अशावेळी नागरिकांना वीज सुरळीत होण्याची प्रतीक्षा असते.

Risks have been made to power | धोका पत्करून वीज केली सुरळीत

धोका पत्करून वीज केली सुरळीत

Next
ठळक मुद्देविद्युत कर्मचाºयांचे काम : गडचिरोली-आरमोरी वाहिनीवरील अडपल्लीत बिघाड

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर कर्मचारी परिस्थितीनुसार वीज दुरूस्तीच्या कामाला लागतात. अशावेळी नागरिकांना वीज सुरळीत होण्याची प्रतीक्षा असते. परंतु उन्ह, वारा, पावसातही महावितरणचे कर्मचारी कठिण परिस्थितीतही वीज पुरवठा सुरळीत करतात. याचाच प्रत्यय अडपल्ली (गोगाव) येथे नुकताच आला. विद्युत कर्मचाºयांनी जीव धोक्यात घालून तलावातील पाण्यात असलेल्या खांबावर चढून वीज पुरवठा सुरळीत केला.
गडचिरोली विभागातील गोगाव (अडपल्ली) येथे ३३ केव्ही वीज वाहिनी तुटून पडली. या वादळाने व वीज व वीज पडल्याने जवळपास १७ इन्सुलेटर्स तुटले. आरमोरी उपविभागाचे उप कार्यकारी अभियंता ए. व्ही. तुपकर यांनी गडचिरोली मंडळाचे अधीक्षक अभियंता अशोक म्हस्के व गडचिरोली विभागाचे कार्यकारी अभियंता विजय मेश्राम यांच्या मार्गदर्शनात इन्सुलेटर्स बदलून वीज पुरवठा सुरळीत केला. परंतु काही ठिकाणी वीज पडल्यामुळे इन्सुलेटर्स तुटले नाही. परंतु कमजोर झाले. ते बदलविणे आवश्यक होते. त्यामुळे उपकार्यकारी अभियंता ए. व्ही. तुपकर, कनिष्ठ अभियंता आशिष बोरकर, वीज कर्मचारी दीपक चौधरी, दुधराम चौधरी, मंगेश बोरकर यांनी कामगारांसोबत तलावातील पाण्यातून वीजखांब गाठून दुरूस्तीचे काम केले. सदर काम करीत असताना कामगारांच्या मानेपर्यंत पाणी होते. असे असतानाही विषारी कीटक, सरपटणारे यांची कसलीही पर्वा न करता कामगारांनी वीज दुरूस्तीचे काम केले.
जिल्ह्यात उन्हाळा, पावसाळा व हिवाळ्यात अनेक ठिकाणी दुर्गम भागात वीज दुरूस्तीचे काम वीज कर्मचारी करतात. कधी दुर्गम जंगलात रानटी श्वापदांची भीती बाळगली जात नाही. तर पावसाळ्यात पुराच्या पाण्याचीही पर्वा कर्मचारी करीत नाही व अविरतपणे वीज दुरूस्तीचे काम करतात. यातून कर्मचाºयांनाही कामाचे समाधान मिळते.
 

Web Title: Risks have been made to power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.