रस्ता झाला उंच, बैलबंडी न्यायची कशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:24 AM2021-06-28T04:24:35+5:302021-06-28T04:24:35+5:30
रस्ता उंच करण्यासाठी वापरलेली काही माती अजूनही शेतातच पडून आहे. माेठमाेठे दगड पडले आहेत. जेसीबीशिवाय हे दगड हटविणे शक्य ...
रस्ता उंच करण्यासाठी वापरलेली काही माती अजूनही शेतातच पडून आहे. माेठमाेठे दगड पडले आहेत. जेसीबीशिवाय हे दगड हटविणे शक्य नाही, तसेच माती हटविण्यासाठीही शेतकऱ्यांना जेसीबी लावावी लागणार आहे. याचा खर्च काेण देणार, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. कालव्यात माती पडल्याने कालवा बुजला आहे. त्यामुळे शेतीच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण हाेणार आहे.
याबाबत बांधकाम विभागाच्या अभियंत्यासमोर शेतकऱ्यांनी समस्या मांडली होती. त्यावर अभियंत्याने लवकरच पर्यायी व्यवस्था होणार याची हमी दिली. मात्र, या गोष्टीस एक महिना उलटून गेला तरीसुद्धा फक्त शब्दच दिलेला आहे. प्रत्यक्षात हंगाम सुरू झाला आहे. मात्र, काेणतीही उपाययाेजना केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये राेष निर्माण झाला आहे.