चिखलामुळे भेंडाळातील रस्ता झाला गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:31 AM2021-07-25T04:31:06+5:302021-07-25T04:31:06+5:30
येथील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच बारीक गिट्टी, चुरी व डागडुजीच्या वेळेस टाकलेली माती रस्त्यावर निघालेली आहे. रात्रीच्या ...
येथील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच बारीक गिट्टी, चुरी व डागडुजीच्या वेळेस टाकलेली माती रस्त्यावर निघालेली आहे. रात्रीच्या सुमारास वाहन चालविताना वाहन चिखलावरून घसरण्याची शक्यता असते. त्यामुळे अपघात होण्याचीही शक्यता बळावली आहे. या रस्त्याचे नूतनीकरण करावे, अशी अनेक वर्षांपासूनची या परिसरातील नागरिकांची मागणी आहे. परंतु दुर्लक्षच केले जाते. पावसाळा सुरू हाेण्यापूर्वी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मुरूम व माती टाकून डागडुजी केली जाते. परंतु अल्पावधीतच रस्त्याची अवस्था ‘जैसे थे’ हाेते. या परिसरातील जवळपास सर्वच रस्ते खराब झाले आहेत. काही ठिकाणच्या रस्त्यावर बारीक खडी पसरली आहे. त्यामुळे वाहने घसरण्याची शक्यता आहे. या समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागासोबत या क्षेत्राचे लोकप्रतिनिधीसुध्दा जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत, असा आराेप परिसरातील नागरिकांकडून हाेत आहे.
बाॅक्स
ग्रामपंचायतीच्या मागणीची दखलच नाही
विशेष म्हणजे, भेंडाळा अनखोडा मार्ग हा अतिशय अरुंद आहे. त्यामुळे मोठ्या वाहनांसोबत लहान वाहनांनासुध्दा ये-जा करताना अडचणी येतात. मागील महिन्यात भेंडाळाच्या सरपंच कुंदा जुवारे यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले होते. परंतु त्या निवेदनाला केराची टोपली मिळाली. सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमध्ये राेष आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
240721\img_20210724_103406.jpg
भेंडाळा गावांतील अंतर्गत रस्ता माखला चिखलाने