यंत्रणेच्या वादात रखडला रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 01:01 AM2018-03-15T01:01:49+5:302018-03-15T01:01:49+5:30

सार्वजनिक बांधकाम विभाग कुरखेडा कार्यालयाच्या अखत्यारीत अंगारा गाव येते. तर कुलकुली हे गाव सार्वजनिक बांधकाम विभाग आरमोरी कार्यालयाच्या हद्दीत समाविष्ठ आहे.

Road blocked in the dispute of the system | यंत्रणेच्या वादात रखडला रस्ता

यंत्रणेच्या वादात रखडला रस्ता

googlenewsNext
ठळक मुद्देअंगारा-कुलकुली मार्गाची दुरवस्था : पाच वर्षांपासून दुरूस्तीचे काम नाही

ऑनलाईन लोकमत
वैरागड : सार्वजनिक बांधकाम विभाग कुरखेडा कार्यालयाच्या अखत्यारीत अंगारा गाव येते. तर कुलकुली हे गाव सार्वजनिक बांधकाम विभाग आरमोरी कार्यालयाच्या हद्दीत समाविष्ठ आहे. मात्र या दोन तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या कार्यालयाच्या वादात मागील पाच वर्षापासून अंगारा-कुलकुली या मार्गाची दुरूस्ती करण्यात आली नाही. परिणामी सदर मार्ग उखडला असून या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे.
दोन तालुक्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वादात सदर रस्त्याच्या दुरूस्तीचा प्रश्न अद्यापही कायम आहे. आरमोरी तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील गाव म्हणजे कुलकुली होय. तर कुरखेडा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर अंगारा हे गाव आहे. दोन तालुक्यांना जोडणारा अंगारा-कुलकुली हा मार्ग नेमक्या कोणत्या तालुक्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. या रस्त्याची मालकी कोणत्या तालुक्याच्या विभागाकडे आहे. या बाबत स्पष्टता नाही. अशा वादातच सदर रस्त्याच्या दुरूस्तीचे काम गेल्या पाच वर्षापासून रखडले आहे.

Web Title: Road blocked in the dispute of the system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.