अतिक्रमणामुळे रस्ता झाला अरूंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 12:13 AM2018-07-09T00:13:03+5:302018-07-09T00:14:53+5:30
देसाईगंज शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बाहेरगावाहून येथे कामानिमित्त येणाऱ्या लोकांच्या संख्येतही वाढ झाली आहे. शिवाय येथील काही व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले असल्याने रस्ता अरूंद झाला आहे. येथे नेहमीच वाहतुकीची कोंडी निर्माण होते. परंतु या समस्येची सोडवणूक करण्याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : देसाईगंज शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बाहेरगावाहून येथे कामानिमित्त येणाऱ्या लोकांच्या संख्येतही वाढ झाली आहे. शिवाय येथील काही व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले असल्याने रस्ता अरूंद झाला आहे. येथे नेहमीच वाहतुकीची कोंडी निर्माण होते. परंतु या समस्येची सोडवणूक करण्याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्टेशन आणि सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नावारूपास आलेले देसाईगंज शहर आज अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. शहरातील प्रत्येक अंतर्गत रस्त्यावर जिथे जागा मिळेल तिथे आपल्या मनाजोगे व्यवसाय करणाºया लोकांची संख्या वाढली आहे. रस्त्यावर अतिक्रमण करून अनेकांनी आपली दुकाने थाटली आहेत. रहदारीच्या मुख्य रस्त्यावर म्हणजेच आरमोरी ते कुरखेडा मार्गावर हुतात्मा स्मारक, विश्रामगृह मोटारस्टँड, तुकुम मार्गापर्यंत व्यावसायिकांनी लोखंडी रॉड वापरून सिमेंटचे पक्के बांधकाम केले आहे. या व्यावसायिकांनी दुकानातील साहित्य राजरोसपणे कासवगतीने का होईना पण पुढे-पुढे सरकवीत आहेत. याचा परिणाम वस्तूंची खरेदी करण्याकरिता येणारा ग्राहक आपली वाहने रस्त्यावर कशाही पद्धतीने उभे करून ठेवतात. या मार्गावर दुचाकी, चारचाकी, जवजड वाहने तसेच पादचारी आवागमन करीत असतात. त्यामुळे रस्ते कितीही रूंद असले तरी अतिक्रमणामुळे अरूंद झाले असून मार्गक्रमण करताना वाहनधारकच नव्हे तर पादचाºयांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
अतिक्रमणधारकांना स्थानिक प्रशासनाकडून अनेकदा नोटीस देण्यात आल्या. परंतु काहीच उपयोग झाला नाही. अतिक्रमणधारक नगर पालिका प्रशासनाच्या नोटीसकडे दुर्लक्ष करून आपला व्यवसाय थाटून आहेत.