हा आहे गेल्या ३० महिन्यांपासून तयार होत असलेला रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 01:56 PM2021-01-29T13:56:20+5:302021-01-29T14:42:51+5:30
Road Gadchiroli News २०१८ च्या मे महिन्यात सुरू झालेले रस्त्याचे बांधकाम अद्यापही अपूर्ण राहिले असून नागरिकांनी रस्ता पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: २०१८ च्या मे महिन्यात सुरू झालेले रस्त्याचे बांधकाम अद्यापही अपूर्ण राहिले असून नागरिकांनी रस्ता पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
धानोरा ते ठाणेगाव मार्गाच्या रस्त्याचे रूंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याकरिता कंञाटदाराने सोडे गावापासून खोदकाम सुरु केले. मात्र तब्बल २७ महिने लोटूनही रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने याचा त्रास जनता जनार्दन सोसत असून अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
प्रत्यक्ष मे 2018 मधे खोदकाम केल्यानंतर पावसाळा सुरु झाला. नंतर काही तांत्रिक अडचणी आल्या मग रस्ताच वाहून गेला. गेल्या वर्षी मार्चपासून करोनामुळे काम ठप्प झाले. नंतर वर्षा अखेर लोकांना वाटायला लागले कि आता काम पुर्ण होईल. पण हीअपेक्षा फोल ठरली. जानेवारी 2021 उजाडले पण काम जैसे थेच आहे. अशाही कठिण परिस्थितीत मोठी कसरत करत वाहने लोक काढत प्रवास करत आहेत.