रांगी-जांभळी मार्गाची दुरवस्था
By admin | Published: October 15, 2015 01:45 AM2015-10-15T01:45:56+5:302015-10-15T01:45:56+5:30
धानोरा तालुक्यातील रांगी येथूून सहा किमी अंतरावर असलेल्या जांभळीकडे जाणाऱ्या रस्त्याची पूर्णत: दुरवस्था झाली आहे.
वाहनधारकांची पंचाईत : प्रशासनाचे कायम दुर्लक्ष
रांगी : धानोरा तालुक्यातील रांगी येथूून सहा किमी अंतरावर असलेल्या जांभळीकडे जाणाऱ्या रस्त्याची पूर्णत: दुरवस्था झाली आहे. या खडीकरण मार्गावरील गिट्टी पूर्णत: उखडली असून ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले आहे. परिणामी वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मात्र याकडे प्रशानाचे दुर्लक्ष होत आहे.
रांगी हे या परिसरातील महत्त्वाचे गाव आहे. रांगी येथे शासकीय आदिवासी आश्रमशाळा आहे. तसेच एक खासगी माध्यमिक शाळा आहे. रांगी येथे बुधवारी आठवडी बाजारही भरतो. बँक शाखा आहे. त्यामुळे परिसरातील पाच-सहा गावातील शेकडो नागरिक रांगी येथे येऊन व्यवहार करतात. तसेच आपले दैनंदिन कामेही करतात. त्यामुळे जांभळी-रांगी मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र सदर मार्ग पूर्णत: उखडल्यामुळे वाहनधारकांना त्रास होत आहे. या मार्गाची पक्की दुरूस्ती करावी, अशी मागणी रांगी परिसरातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)