रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:38 AM2021-08-23T04:38:55+5:302021-08-23T04:38:55+5:30
मार्गदर्शक म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव डी.डी. फुलझेले, माेटार वाहन निरीक्षक याेगेश माेडक उपस्थित हाेते. न्यायालयात प्रलंबित प्रकरणात ...
मार्गदर्शक म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव डी.डी. फुलझेले, माेटार वाहन निरीक्षक याेगेश माेडक उपस्थित हाेते. न्यायालयात प्रलंबित प्रकरणात किंवा दावा दाखल करण्याकरिता एखादा पक्षकार खासगी वकिलांची नियुक्ती करू शकत नसेल, तर त्या पक्षकाराला विहित अर्जाच्या माध्यमातून विनामूल्य वकील उपलब्ध करून देता येतो, तसेच न्यायालयात प्रलंबित तडजाेडपात्र असलेला मामला मध्यस्थीच्या माध्यमातून आपला वेळ, पैसा व श्रम वाचवून निकाली काढता येताे, असे न्या. डी.डी. फुलझेले यांनी सांगितले. वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करणे आवश्यक आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन करून आपण अपघात टाळू शकताे. वाहन चालविताना हयगय करू नये, पार्किंग, राेड सिग्नल व नियमांचे पालन करावे व दुसऱ्यांना त्याबाबत अवगत करावे, असे आवाहन माेटार वाहन निरीक्षक याेगेश माेडक यांनी केले. शिबिरात शासकीय अधिकारी, कर्मचारी, सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी तसेच अंगणवाडीसेविका, अधिवक्ता, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी ऑनलाइन सहभागी झाले हाेते. कार्यक्रमाचे संचालन कनिष्ठ लिपिक एस.के. चुधरी, तर आभार एस.टी. सहारे यांनी मानले. यशस्वितेसाठी शंकर आळे, अविनाश उत्तरवार, नितीन जाधव व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
220821\22gad_2_22082021_30.jpg
कार्यक्रमाला उपस्थित न्या. डी.डी. फुलझेले, याेगेश माेडक व अन्य.