मान्सूनपूर्व पावसातच रस्त्याची उडाली दाणादाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:27 AM2021-06-06T04:27:43+5:302021-06-06T04:27:43+5:30
चामाेर्शी-हरणघाट रस्ता पूर्णतः खराब झाला असून रस्त्याच्या मधोमध नाल्या तयार झाल्या आहेत. गेल्या तीन वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक ...
चामाेर्शी-हरणघाट रस्ता पूर्णतः खराब झाला असून रस्त्याच्या मधोमध नाल्या तयार झाल्या आहेत. गेल्या तीन वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. सध्या खड्ड्यांमुळे संपूर्ण रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे नियमितपणे रस्त्यावरून वाहने चालविणाऱ्या वाहनधारकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे तर आहेतच; परंतु बारीक गिट्टी, चुरी, डागडुजीच्या वेळेस टाकलेली माती रस्त्यावर निघालेली आहे. रात्री वाहनधारकांना धुळीमुळे वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते. रोहिणी नक्षत्राच्या पहिल्या पावसाने संपूर्ण रस्ता पाण्यात गेला की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली हाेती. मागील वर्षी काही ठिकाणी डांबर टाकले होते; परंतु पहिल्या पावसात ते डांबर उखडून मोठमोठे खड्डे तयार झाले. रस्त्याचे पक्के बांधकाम करावे, अशी अनेक वर्षांपासून मागणी केली जात आहे. परंतु याकडे दुर्लक्ष हाेत आहे. मागील वर्षी पावसाळ्यात या रस्त्यावर खड्डे पडले हाेते. त्यामुळे काही प्रमाणात या रस्त्याची डागडुजी करण्यात आली; मात्र त्यानंतर अवस्था ‘जैसे थे’ झाली. आता तर पहिल्या पावसाने रस्त्याची दाणादाण उडाली.
बाॅक्स
परिसरातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था
भेंडाळा परिसरातील जवळपास सर्वच रस्ते खराब झाले आहेत. काही ठिकाणच्या रस्त्यावर बारीक डांबर उखडून खडी रस्त्यात पसरली आहे. त्यामुळे ये-जा करणारे वाहन घसरण्याची भीती असते. शुक्रवारच्या पावसाने रस्त्याच्या कडेला चिखल तयार झाला. एका दिवसातच उन्हामुळे वाळल्याने त्याला नालीचे रूप प्राप्त झाले. सदर मार्ग वर्दळीचा आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागासोबत या क्षेत्राचे लोकप्रतिनिधीसुद्धा जाणीवपूर्वक सदर समस्येकडे दुर्लक्ष करीत आहेत, असा आराेप परिसरातील नागरिकांनी केला आहे.
===Photopath===
050621\img_20210604_143754.jpg
===Caption===
चामाेर्शी-हरणघाट मार्गावरील खड्ड्यात अशाप्रकारे पाणी साचले आहे.