रस्त्यावरच्या फांद्यांमुळे रहदारीस अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:38 AM2021-05-21T04:38:50+5:302021-05-21T04:38:50+5:30
आष्टी-सिरोंचा या महामार्गाने दिवसभर बांबूचे ट्रक व मोठमोठे ट्रेलर जात असतात. पेट्रोलपंपापासून पुढे जंगल आहे. रस्त्याच्या बाजूला मोठमोठी झाडे ...
आष्टी-सिरोंचा या महामार्गाने दिवसभर बांबूचे ट्रक व मोठमोठे ट्रेलर जात असतात. पेट्रोलपंपापासून पुढे जंगल आहे. रस्त्याच्या बाजूला मोठमोठी झाडे आहेत. ओव्हरलोड बांबूचे ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांच्या फांद्यांना लागतात. त्यामुळे वाहन चालवताना चालकाला बरीच कसरत करावी लागते. तसेच रस्ता ओलांडून महावितरण कंपनीचे सर्व्हिस वायर गेलेले आहेत. त्यामुळे ओव्हरलोड ट्रकने हे सर्व्हिस वायर तुटून वारंवार वीजप्रवाह खंडित होत आहे. तसेच वादळ व वाऱ्यापासून झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावरील वाहनांवर पडून अपघात होण्याची शक्यता आहे. तेंदूपत्ताचे बोध भरलेल्या ट्रकने सर्व्हिस वायर तुटल्यास विजेच्या प्रवाहाने आग लागून ट्रक पेटण्याचीही शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी बांबूच्या ट्रकने सर्व्हिस वायर तुटून स्पार्किंग झाले व तारा तुटल्या होत्या. त्यामुळे वाहतूक प्रभावित झाली होती. मात्र, मोठा अपघात टळला. बांधकाम विभागाने पावसाळा सुरू होण्याअगोदर फांद्या तोडण्यात याव्या, अशी मागणी होत आहे.