भाकरोंडीत रस्ते खड्डेमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:41 AM2021-07-14T04:41:44+5:302021-07-14T04:41:44+5:30
आरमोरी : भाकरोंडी परिसरातील अनेक गावातील रस्त्यांचे २० वर्षांपूर्वी बांधकाम करून डांबरीकरण करण्यात आले, परंतु सदर मार्गाची अद्यापही दुरुस्ती ...
आरमोरी : भाकरोंडी परिसरातील अनेक गावातील रस्त्यांचे २० वर्षांपूर्वी बांधकाम करून डांबरीकरण करण्यात आले, परंतु सदर मार्गाची अद्यापही दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. आता डांबरीकरण पूर्णतः उखडले आहे.
उद्याेग अभावी राेजगारांची समस्या गंभीर
धानाेरा : छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या धानोरा तालुका मुख्यालयात औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. मात्र, याबाबत अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे व्यावसायिकांना उद्योग टाकण्यास अडचणी येत आहेत. जागा उपलब्ध असूनही वापर नाही.
अहेरी तालुक्यात कव्हरेजचा अभाव
अहेरी : आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावरील गोलाकर्जी गावात कव्हरेज नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गोलाकर्जी रस्त्यावर असल्याने राजाराम, खांदला, पत्तीगाव, चिरेपल्ली, छल्लेवाडा, मरनेली येथील नागरिकांशी संपर्क होत नाही. अतिदुर्गम भागात कव्हरेजच्या नावाने बाेंब हाेत आहे.
शेकडाे शेतकरी सातबारा पासून वंचित
आरमाेरी : वनहक्क कायद्यांतर्गत शेतकऱ्यांना अतिक्रमित जागेच्या मालकी हक्काचे पट्टे देण्याची कार्यवाही जिल्ह्यात सुरू आहे. मात्र, हे पट्टे मिळालेले शेकडो शेतकरी सातबारा पासून वंचित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यास अडचणी येत आहे. सातबारा नसल्याने कृषी याेजनांचा लाभ मिळत नाही.
मालेवाडा भागात समस्या
कुरखेडा : कोरची व धानोरा या दुर्गम भागांना जोडणारा मालेवाडा परिसर आजही शासन व प्रशासनाच्या नजरेत दुर्लक्षित आहे. या भागात ५० किमीच्या परिसरात केवळ एकाच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भरवशावर आरोग्य सेवा आहे. आरोग्यसेवा सुधारण्याची मागणी होत आहे, परंतु याकडे दुर्लक्ष हाेत आहे.