दलालांकडून कामगारांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 12:00 AM2019-08-19T00:00:25+5:302019-08-19T00:01:08+5:30

बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी केली जात आहे. आपण नोंदणी करून देऊ असे सांगून पैसे लुटणारे दलाल सक्रीय झाले आहेत. दलालांच्या हातात कोणतेच अधिकार नसताना कामगारांकडून एक हजार ते दीड हजार रुपये घेऊन त्यांची लूट करीत आहेत.

Robbery of labor by brokers | दलालांकडून कामगारांची लूट

दलालांकडून कामगारांची लूट

Next
ठळक मुद्देअटल विश्वकर्मा योजनेची नोंदणी : प्रत्येक अर्जासाठी घेतले जाताहेत एक हजार रुपये

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी केली जात आहे. आपण नोंदणी करून देऊ असे सांगून पैसे लुटणारे दलाल सक्रीय झाले आहेत. दलालांच्या हातात कोणतेच अधिकार नसताना कामगारांकडून एक हजार ते दीड हजार रुपये घेऊन त्यांची लूट करीत आहेत.
बांधकाम क्षेत्रात काम करणाºया मजुरांसाठी शासनाने अटल विश्वकर्मा सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत इमारत, रस्ते, मार्ग, रेल्वे, पाठबंधारे, रंगकाम, सूतार काम, नाली बांधणी, ईलेक्ट्रिक, अग्नीशमन यंत्रणा, विटांचे काम, सौरऊर्जेशी निगडीत काम, फेब्रीकेशनची कामे आदी क्षेत्रात काम करणाºया मजुरांना या योजनेचा लाभ दिला जातो. योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम कामगार विभागात नोंदणी करावी लागते. नोंदणीसाठी ज्या कंत्राटदाराकडे संबंधित मजुराने काम केले आहे. त्या कंत्राटदाराचे प्रमाणपत्र, राशन कार्ड, आधार कार्ड, फोटो आवश्यक आहेत. नोंदणी करण्यासाठी मजुरांची गर्दी उसळत आहे. याचा गैरफायदा घेण्यासाठी दलाल तयार झाले आहेत. संबंधित मजुराला एका अर्जामागे एक हजार ते दीड हजार रुपये मागून त्याची नोंदणी करून देण्याचे आश्वासन देत आहेत. वास्तविक संबंधित दलालाचा नोंदणीशी काहीही संबंध नाही.
आजपर्यंत तालुकास्तरावर व मोठ्या गावात नोंदणी शिबिर घेतले जात होते. या शिबिरांमध्ये सदर गर्दी उसळत असल्याने कामगार कार्यालयातील कर्मचारी नागरिकांना अर्ज ठेवण्यास सांगत होते. याचा फायदा घेत संबंधित दलाल नागरिकांकडून आणलेले अर्ज ठेवून मोकळे होत होते. नोंदणी झालेल्या मजुराचा कार्ड बनत होता. त्यानंतर त्याला साहित्य व पैशाचाही लाभ होत होता. हा सर्व लाभ आपल्यामुळेच झाला, असे सांगून संबंधित दलाल कामगारांकडून पैसे उखडत आहेत. कामगारांनी त्यांच्यापासून सावध राहावे, असे आवाहन अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले आहे.

आता जिल्हास्तरावरच होणार नोंदणी
तालुकास्तरावरील नोंदणी शिबिरे बंद करण्यात आली आहेत. आता केवळ जिल्हा कामगार अधिकारी कार्यालय गडचिरोली येथेच नोंदणी केली जाणार आहे. ही नोंदणी वर्षभर चालू राहणार आहे. नोंदणीसाठी सोमवार व बुधवार हे दोन दिवस ठरविण्यात आले आहेत. मंगळवारी कार्डांचे नुतनीकरण होईल. गुरूवारी अर्थसहाय्यासाठी अर्ज स्वीकारले जातील. कार्यालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. अर्जाची नोंदणी झाल्यानंतर अर्थसहाय्याचा अर्ज भरावा लागतो. त्यानंतरच पाच हजार रुपये अनुदान प्राप्त होते. काही मजुरांची नोंदणी झाली आहे. मात्र त्यांनी अर्थसहाय्याचा अर्ज भरला नाही. त्यामुळे त्यांना अनुदान मिळाले नाही.

Web Title: Robbery of labor by brokers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.