रोहयो कामातून मिळाला रोजगार
By admin | Published: May 1, 2017 02:16 AM2017-05-01T02:16:48+5:302017-05-01T02:16:48+5:30
सिरोंचा तालुक्यात अनेक ग्रामपंचायतीच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत
झिंगानूरात मजगीचे काम सुरू : १५ वर मजूर कामावर
झिंगानूर : सिरोंचा तालुक्यात अनेक ग्रामपंचायतीच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेततळे, मजगी, बोडी, तलाव, भातखाचर आदीसह विविध कामे सुरू करण्यात आली आहे. या कामामुळे शेकडो मजुरांना रोजगार प्राप्त झाला आहे. तालुक्यातील झिंगानूर येथे मजगीचे काम सुरू करण्यात आल्याने गावातील १५ वर मजूर या कामावर आहेत.
झिंगानूर येथील मड्डे येला सन्याशी याच्या शेतात शंकर एम. मडावी यांच्या हस्ते मजगीचे काम सुरू करण्यात आले. यावेळी गावातील नागरिक व मजूर उपस्थित होते. झिंगानूर परिसरातील झिंगानूर माल येथेही रोजगार हमी योजनेचे कामे सुरू झाल्याने नोंदणीकृत मजुरांना रोजगार प्राप्त झाला आहे. १५ दिवसांपूर्वी या भागात रोजगार हमी योजनेची कामे सुरू झाली नव्हती. त्यामुळे मजूर रिकाम्या हाताने भटकत होते. ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाकडे तसेच नरेगा विभागाकडे मागणी केल्यानंतर झिंगानूर व झिंगानूर माल येथे रोहयोची कामे करण्यात आली. (वार्ताहर)