रोहयोवर १२८ कोटी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:51 AM2018-04-11T00:51:07+5:302018-04-11T00:51:07+5:30

जिल्ह्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमीच्या कामांवर २०१७-१८ या आर्थिक वर्षात १२७ कोटी ९८ लाख २४ लाख रुपये खर्च झाले आहेत. मात्र तरीही अपेक्षित लक्ष्य पूर्ण करण्यात जिल्हा मागेच राहिला आहे.

Rohooyo spent 128 crores | रोहयोवर १२८ कोटी खर्च

रोहयोवर १२८ कोटी खर्च

Next
ठळक मुद्दे१ लाख ९१ हजार मजुरांना लाभअहेरी तालुका लक्ष्यपूर्तीत पुढेचामोर्शी तालुक्यात सर्वाधिक निधी खर्च

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमीच्या कामांवर २०१७-१८ या आर्थिक वर्षात १२७ कोटी ९८ लाख २४ लाख रुपये खर्च झाले आहेत. मात्र तरीही अपेक्षित लक्ष्य पूर्ण करण्यात जिल्हा मागेच राहिला आहे. मनुष्यदिन निर्मितीचे लक्ष्य ७६.४१ टक्के तर रोहयोवरील खर्चाचे लक्ष्य ६९.०३ टक्के पूर्ण होऊ शकले.
गेल्या आर्थिक वर्षात बाराही तालुके मिळून ५२ लाख २० हजार ८८६ मनुष्यदिन रोजगार निर्मिती आणि १८५ कोटी ३९ लाख ३७ हजार रुपये खर्चाचे लक्ष्य देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात ३९ लाख ८९ हजार ११२ मनुष्यदिन रोजगार निर्मिती झाली. यात दिलेले लक्ष्य पूर्ण करण्यात अहेरी तालुक्याने आघाडी घेतल्याचे दिसून येते. या तालुक्याला रोहयोच्या कामावर ६ कोटी २ लाख ३९ हजार रुपये खर्च करण्याचे उद्दीष्ट होते. मात्र प्रत्यक्षात ८ कोटी ९ लाख १६ हजार रुपये खर्च होऊन लक्ष्याच्या तुलनेत १३४.३३ टक्के खर्च झाला आहे. याशिवाय मुलचेरा तालुक्यानेही उद्दीष्टापेक्षा जास्त खर्च करण्यात आघाडी घेतली आहे. या तालुक्याला ६ कोटी ६१ लाख ४० हजार रुपये खर्चाचे उद्दीष्ट होते. मात्र प्रत्यक्षात ८ कोटी ४५ लाख ७८ हजार रुपये खर्च करून या तालुक्याने १२७.८८ टक्के लक्ष्य गाठले आहे.
रोजगार हमीच्या कामावरील एकूण खर्चापैकी अकुशल कामगारांच्या मजुरीचा खर्च ८५ कोटी २८ लाख ९४ हजार तर अर्धकुशल कामगारांच्या मजुरीवर २३ लाख रुपये खर्च झालेत. याशिवाय साहित्य व कुशल कामगारांवर ३७ कोटी ५० लाख ६२ हजार रुपये खर्च झाले आहेत.
३१,४०२ मजुरांचे जॉबकार्ड वगळले
गेल्या वर्षभरात विविध कारणांमुळे स्थलांतरित झालेल्या किंवा मृत पावलेल्या ७१६९ कुटुंबातील ३१ हजार ४०२ मजुरांचे जॉबकार्ड यादीतून वगळण्यात आले. मात्र यादरम्यान दुसरीकडून या जिल्ह्यात स्थलांतरित होऊन आलेल्या ९१९४ कुटुंबातील २२ हजार ७३५ मजुरांचे जॉबकार्ड नव्याने बनविण्यात आले आहेत.
चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक मजूर
वर्षभरात जिल्ह्यातील १ लाख ९१ हजार ७८३ मजुरांनी रोजगार हमीच्या कामांचा लाभ घेतला. त्यापैकी चामोर्शी तालुक्यातील सर्वाधिक २७ हजार ३३१ मजुरांनी या कामांवर हजेरी लावली. त्याखालोखाल कुरखेडा तालुक्यात २६ हजार ९८५ मजुरांनी तर धानोरा तालुक्यात २६ हजार ५४ मजुरांनी रोजगार हमीची कामे केली. या कामांवर सर्वात कमी मजूर एटापल्ली तालुक्यात आले. वर्षभरात अवघ्या ४२०१ मजुरांनी या कामांचा लाभ घेतला आहे.
 

Web Title: Rohooyo spent 128 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.