विकासाच्या वातावरण निर्मितीसाठी महसूल विभागाची भूमिका महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 05:00 AM2021-08-02T05:00:00+5:302021-08-02T05:00:37+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट राेजी महसूल दिनाचे आयाेजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले हाेते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते मार्गदर्शन करीत हाेते. १ ऑगस्ट ते ३१ जुलै महसूली वर्ष मानले जाते. या कालावधीच्या शेवटी वर्षभरातील महसूल आकारणी व वसूली यांचा ताळमेळ घालण्याचे काम महसूल विभागाकडून केले जाते. महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन सर्व महसूली यंत्रणेमार्फत  केले जाते.

The role of revenue department is important for creating an environment for development | विकासाच्या वातावरण निर्मितीसाठी महसूल विभागाची भूमिका महत्त्वाची

विकासाच्या वातावरण निर्मितीसाठी महसूल विभागाची भूमिका महत्त्वाची

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन, महसूल दिनानिमित्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा असून विकासाकरिता वातावरण निर्मिती करण्याचे महत्त्वाचे काम महसूल विभाग करतो असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले. 
जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट राेजी महसूल दिनाचे आयाेजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले हाेते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते मार्गदर्शन करीत हाेते. १ ऑगस्ट ते ३१ जुलै महसूली वर्ष मानले जाते. या कालावधीच्या शेवटी वर्षभरातील महसूल आकारणी व वसूली यांचा ताळमेळ घालण्याचे काम महसूल विभागाकडून केले जाते. महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन सर्व महसूली यंत्रणेमार्फत  केले जाते. याचवेळी प्रामुख्याने लोकांशी निगडीत विविध महसुली तसेच विकास योजनांची माहिती गावस्तरावर पोहचविण्याचे कार्य महसूल विभाग करतो. 
यावेळी अधिकारी व कर्मचारी यांना विशेष कामगिरी करीता प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी  आशिष येरेकर, कुरखेडाचे उपविभागीय अधिकारी समाधान शेंडगे, निवासी उपजिल्हाधिकारी जी.एम.तळपादे, उपजिल्हाधिकारी निवडणुक कल्पना ठुबे, तहसिलदार गडचिरोली महेंद्र गणवीर उपस्थित होते. 
यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आशिष येरेकर यांनी आपले मनोगत सांगून पूरपरिस्थितीमध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने चांगले काम केले आहे. महसूल विभाग सर्व कामे करत असतो ही अभिमानाची बाब आहे असे म्हणाले.  प्रास्ताविक तहसिलदार महेंद्र गणवीर तर आभार कुरखेडाचे तहसिलदार माळी यांनी मानले.

या कर्मचारी व अधिकाऱ्यांचा झाला सन्मान 
उत्कृष्ट कामगीरी केल्याबाबत कुरखेडाचे उपविभागीय अधिकारी समाधान शेंडगे उपविभागीय, गडचिराेलीचे तहसीलदार महेंद्र गणवीर आरमाेरीचे तहसीलदार कल्याणकूमार डहाट कुरखेडाचे तहसीलदार सोमनाथ माळी, भामरागडचे नायब तहसीलदार अनमोल कांबळे, सिराेंचाचे नायब तहसीलदार हमीद सय्यद, नायब तहसिलदार नारायण दांडेकर, दिपक गट्टे, सत्यनारायण अनमदवार, ज्याेती तायडे, मारोती कूळमेथे ,महेश चूनारकर, पियूष आखाडे, अल्पेश बारापात्रे, अंजना सोनकूसरे, साधना जूमनाके तलाठी भूषन जवंजाळकर, विकास कूमरे,  निशांत भानारकर, गणेश खांडरे, सोमलकर, यामीनी सडमेक यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

 

Web Title: The role of revenue department is important for creating an environment for development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.