शैक्षणिक धाेरण अंमलबजावणीत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:48 AM2021-02-25T04:48:41+5:302021-02-25T04:48:41+5:30

गाेंडवाना विद्यापीठ, भारतीय शिक्षण मंडळ व नीती आयाेग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शैक्षणिक धाेरण -२०२० या विषयावर आभासी पद्धतीने ...

The role of teachers is important in the implementation of educational concepts | शैक्षणिक धाेरण अंमलबजावणीत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची

शैक्षणिक धाेरण अंमलबजावणीत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची

Next

गाेंडवाना विद्यापीठ, भारतीय शिक्षण मंडळ व नीती आयाेग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शैक्षणिक धाेरण -२०२० या विषयावर आभासी पद्धतीने व्याख्यानमाला घेण्यात आली. याप्रसंगी ते बाेलत हाेते. व्याख्यानमालेत प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डाॅ. श्रीराम कावळे, कुलसचिव डाॅ. अनिल चिताडे, विज्ञान विभागाचे अधिष्ठाता डाॅ. सुरेश रेवतकर, प्रमुख वक्ते म्हणून गाेंदियाचे माजी प्राचार्य डाॅ. केशव भंडारकर, भारतीय शिक्षण मंडळ विदर्भ प्रांताचे सचिव डाॅ. नारायण मेहर आदी सहभागी झाले होते. प्रास्ताविकेतून डाॅ. अनिल चिताडे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धाेरणाची अंमलबजावणी करताना गाेंडवाना विद्यापीठाची वाटचाल आणि भूमिका विशद केली. डाॅ. नारायण मेहर यांनी जागतिक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी टिकून माेलाचे कार्य पार पाडावे, असे आवाहन केले. डाॅ. केशव भांडारकर यांनी, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती म्हणजे, प्राध्यापकांचा विजय आहे. प्राथमिक शिक्षकांनी प्रगतीचे मार्ग ओळखून त्यानुसार वाटचाल करावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. रजनी वाढई यांनी केले. आभार राष्ट्रीय शैक्षणिक धाेरण अंमलबजावणी समितीचे संयाेजक डाॅ. विवेक जाेशी यांनी मानले.

Web Title: The role of teachers is important in the implementation of educational concepts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.