वादळाच्या तडाख्याने घरांचे छप्पर उडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 01:22 AM2018-06-23T01:22:17+5:302018-06-23T01:23:14+5:30

तालुक्यातील रामपूर चक गावाला गुरुवारच्या सायंकाळी झालेल्या वादळाने चांगलाच तडाखा दिला. वादळामुळे या गावातील अनेक नागरिकांच्या घरांवरील छत उडाले आहेत. त्यामुळे नागरिकांना बेघर होण्याची पाळी आली आहे.

The roof of the house was flooded by the storm | वादळाच्या तडाख्याने घरांचे छप्पर उडाले

वादळाच्या तडाख्याने घरांचे छप्पर उडाले

googlenewsNext
ठळक मुद्देपंचनामे करा : रामपूर चक येथील २० पेक्षा अधिक घरांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : तालुक्यातील रामपूर चक गावाला गुरुवारच्या सायंकाळी झालेल्या वादळाने चांगलाच तडाखा दिला. वादळामुळे या गावातील अनेक नागरिकांच्या घरांवरील छत उडाले आहेत. त्यामुळे नागरिकांना बेघर होण्याची पाळी आली आहे.
सायंकाळी जोरदार वादळ झाले. या वादळात देवीदास प्रधान, अरविंद गुरनुले, श्रीराम प्रधान, उमाजी प्रधान, लक्ष्मण लेनगुरे, रामचंद्र प्रधान, हरिदास गुरनुले, बाबुराव गुरनुले, रामचंद्र लेनगुरे, विनायक लेनगुरे, विठ्ठल लेनगुरे, तुकडोजी लेनगुरे, अभिमन्यू सहारे, सुरेश चौधरी, प्रल्हाद ठेंगरी, सरस्वती निकुरे, सत्यभामा ठाकरे, अर्जुनदास प्रधान, जगन वाटगुरे, मारोती लेनगुरे, संजय निकुरे, प्रकाश गुरनुले, अशोक प्रधान, सुरेश प्रधान, दयाराम ठेंगरी, बबन माकडे, लक्ष्मण सहारे, गोपाल राऊत यांच्या घराचे नुकसान झाले.
याबाबतची माहिती तहसीलदार यांना देण्यात आली आहे. तलाठ्यांच्या मार्फत नुकसानीचे सर्वे करून ज्या नागरिकांच्या घरांचे छत उडाले आहे किंवा घर कोसळले आहे त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.
ऐन पावसाळ्याच्या दिवसात काही नागरिकांच्या घर व गोठ्यावरील टीन उडाले. तर काही नागरिकांच्या घरावरील कवेलू उडून गेले. शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पैसा जमा करून ठेवला आहे. हा पैसा आता घर दुरूस्तीवर खर्च करावा लागणार आहे. घर दुरूस्तीत पैसा खर्च झाल्यास हंगामासाठी कुठून पैसा आणावा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. ऐन पावसाळ्यात घरावरील छत उडाल्याने ते दुरूस्तच करावे लागणार आहे.
शेतीचा हंगाम सोडून शेतकऱ्यांना घर दुरूस्तीची कामे करावी लागणार आहेत. परिणामी शेतकऱ्यांसमोेर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहे, अशा नागरिकांच्या घरांचे पंचनामे करून संबंधित नागरिकांना मदत देण्यात यावी, अशी मागणी नुकसानग्रस्तांनी केली आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते दिलीप घोडाम यांनी गाव गाठून नुकसानीची माहिती तहसीलदारांना देऊन पंचनामे करण्याची मागणी केली.

Web Title: The roof of the house was flooded by the storm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस