पालिकेने केली २२ लाखांची कर वसुली

By admin | Published: February 11, 2016 12:03 AM2016-02-11T00:03:14+5:302016-02-11T00:03:14+5:30

सन २०१५-१६ हे आर्थिक वर्ष ३१ मार्च २०१६ रोजी संपणार आहे.

Rs 22 lakh tax collected by the Municipal Corporation | पालिकेने केली २२ लाखांची कर वसुली

पालिकेने केली २२ लाखांची कर वसुली

Next

२० दिवसांत : वसुली पथकाचा पुढाकार; थकबाकीदारांना ३१ मार्चपर्यंतचा अल्टीमेटम
सन २०१५-१६ हे आर्थिक वर्ष ३१ मार्च २०१६ रोजी संपणार आहे. आर्थिक वर्षाच्या अखेरीस ३१ मार्चपर्यंत नगर पालिका, नगर पंचायत, ग्रामपंचायत प्रशासनाने थकीत कर वसुली करून शासनाला सहकार्य करावे, अशा सूचना शासनस्तरावरून जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने गडचिरोली, देसाईगंज नगर पालिकेला पत्रान्वये ३१ मार्चपर्यंत थकीत जुनी व चालू वर्षातील गृह व पाणी कराची वसुली करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून सूचना प्राप्त झाल्यानंतर गडचिरोली पालिकेने कर वसुलीसाठी पाच पथक गठित केले. प्रत्येक पथकामध्ये दोन कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. सदर कर वसुली पथकातील कर्मचारी गडचिरोली शहरातील सर्व वॉर्डात फिरून कुटुंबधारकांकडून गृह व पाणी कराची वसुली करीत आहेत.
१८ जानेवारी रोजी नगर पालिकेने ९७ हजार रूपयांची मालमत्ता (गृहकर) वसुली केली. १९ जानेवारीला ४५ हजार, २२ जानेवारी ४८ हजार, २५ ला ६९ हजार, २७ ला ७८ हजार, २८ ला ५३ हजार, २९ ला ४७ हजार, ३० ला ५७ हजार रूपयांची कर वसुली केली. १ फेब्रुवारीला १ लाख १५ हजार, २ ला १ लाख ३ हजार, ३ ला २ लाख ५९ हजार, ४ ला १ लाख ४९ हजार, ५ ला १ लाख ४ हजार, ६ ला १ लाख १० हजार व ८ ला १ लाख २ हजार रूपये असे एकूण १६ लाख १८ हजार ५०० रूपयांची कर वसुली केली आहे.
पालिकेने २० दिवसांच्या कालावधीत एकूण ५ लाख ८२ हजार रूपयांची पाणीपट्टी कर वसुली केली आहे. यामध्ये २२ जानेवारी ३७ हजार ७००, २५ ला ३७ हजार ४००, २७ ला ३५ हजार, २८ ला २४ हजार ८००, २९ ला ४५ हजार, ३० ला ३५ हजार ६००, १ फेब्रुवारीला ७६ हजार ६००, २ ला ६५ हजार, २ ला ६७ हजार, ४ ला ५० हजार ५००, ५ ला ५८ हजार, ६ ला ५३ हजार व ८ फेब्रुवारीला ४५ हजारांची वसुली केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

सधन कुटुंब प्रमुखांची पालिकेकडे धाव
गडचिरोली शहरातील २३ पैकी अर्ध्याअधिक वॉर्डात सधन कुटुंब वास्तव्यास आहेत. कर वसुली भरण्याबाबतचे आवाहन पालिकेच्या वतीने लॉऊडस्पिकरच्या माध्यमातून करण्यात आले होते. याची दखल घेऊन सधन कुटुंबातील अनेक नागरिक थेट पालिकेच्या कर विभागातून जाऊन कराचा भरणा करीत असल्याचे दिसून येते.

Web Title: Rs 22 lakh tax collected by the Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.