पथदिव्यांच्या वीजबिलाचे ३३ काेटी रुपये थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:33 AM2021-03-22T04:33:02+5:302021-03-22T04:33:02+5:30

आर्थिक वर्ष संपण्याच्या पूर्वी जास्तीत जास्त वीजबिलाची वसुली व्हावी, यासाठी महावितरणने माेहीम सुरू केली आहे. या अंतर्गत थकबाकीदार ग्राहकांना ...

Rs 33 crore was spent on street lights | पथदिव्यांच्या वीजबिलाचे ३३ काेटी रुपये थकले

पथदिव्यांच्या वीजबिलाचे ३३ काेटी रुपये थकले

Next

आर्थिक वर्ष संपण्याच्या पूर्वी जास्तीत जास्त वीजबिलाची वसुली व्हावी, यासाठी महावितरणने माेहीम सुरू केली आहे. या अंतर्गत थकबाकीदार ग्राहकांना नाेटीस पाठविल्या जात आहेत. मार्च महिन्याच्या पूर्वी वीजबिलाचा भरणा न झाल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन कामाला लागून वीज वापराची माहिती पंचायत समितीकडे सादर करीत आहेत.

बाॅक्स

महावितरणचेही चुकते

घरगुती, वाणिज्य व औद्याेगिक ग्राहकांना दर महिन्याला वीजबिल पाठविले जाते. मात्र पथदिव्यांचे वीजबिल ग्रामपंचायतीला दर महिन्याला दिले जात नाही. त्यामुळे वर्षभर ग्रामपंचायत प्रशासनही वीजबिल भरण्याची प्रक्रिया करण्याकडे दुर्लक्ष करते. मार्च महिन्याच्या शेवटी महावितरणकडून नाेटीस पाठविली जाते. त्यानंतर वीजबिल भरण्याची प्रक्रिया सुरू हाेते. मात्र ही प्रक्रिया अतिशय लांब असल्याने मार्च महिन्याच्या पूर्वी वीजबिल भरले जात नाही.

चंद्रपूरपेक्षा गडचिराेलीचे दुप्पट वीजबिल थकले

चंद्रपूर जिल्ह्याची लाेकसंख्या गडचिराेली जिल्ह्यापेक्षा अधिक आहे. तसेच गावे माेठी असल्याने पथदिव्यांसाठी वापरही अधिक हाेते. मात्र चंद्रपूर जिल्ह्याची पथदिव्यांची थकबाकी केवळ १९ काेटी ४९ लाख रुपये एवढी आहे, तर गडचिराेली जिल्ह्याची थकबाकी ३३ काेटी १४ लाख रुपये एवढी आहे. यावरून गडचिराेली जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने वर्षभर किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचे वीजबिल भरले नसल्याचे स्पष्ट हाेत आहे.

काेट

वीजबिल वसुलीतून प्राप्त हाेणाऱ्या एकूण महसुलापैकी ८५ टक्के महसूल केवळ वीज खरेदीवर खर्च हाेते. उर्वरित रक्कम प्रशासन व इतर बाबींवर खर्च हाेते. महावितरण प्रथम वीजपुरवठा करते. नंतर वीजबिल देते. इतर सेवांमध्ये मात्र प्रथम पैसे माेजावे लागतात. नंतरच सेवा मिळते. याचा विचार करून नागरिकांनी वीजबिल भरणे आवश्यक आहे. वीजबिल वसुलीची माेहीम महावितरणने सुरू केली आहे. काेणत्याही प्रकारच्या ग्राहकाकडे वीजबिल थकले असल्यास वीजपुरवठा खंडित केला जाईल.

- सुनील देशपांडे, मुख्य अभियंता, चंद्रपूर परिमंडळ

विभागनिहाय वीजबिलाची थकबाकी

आकडे काेटीत

ग्राहक आलापल्ली गडचिराेली

घरगुती ८.१६ ७.६३

वाणिज्य ०.८८ १.५५

औद्याेगिक ०.६२ ०.७३

सरकारी कार्यालये १.५६ १.१७

पाणीपुरवठा याेजना ०.४१ ०.४३

पथदिवे १७.१८ १५.९६

एकूण २८.८१ २७.४७

Web Title: Rs 33 crore was spent on street lights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.