रस्सीखेच :

By admin | Published: September 22, 2016 02:20 AM2016-09-22T02:20:31+5:302016-09-22T02:20:31+5:30

पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील क्रीडा गुणांना वाव मिळावा या हेतूने जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या पटांगणावर

Rugby: | रस्सीखेच :

रस्सीखेच :

Next

रस्सीखेच : पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील क्रीडा गुणांना वाव मिळावा या हेतूने जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या पटांगणावर सोमवारपासून विविध क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला. तीन दिवसीय स्पर्धेत बुधवारी समारोपीय कार्यक्रमात रस्सीखेच स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेंमध्ये पोलीस अधिकाऱ्यांची चमू विरूद्ध पोलीस कर्मचाऱ्यांची चमू असा सामना रंगला. अधिकारांच्या दृष्टीने वरचढ असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या चमूने या स्पर्धेतही निर्विवाद वर्चस्व राखीत पोलीस कर्मचाऱ्यांच्या चमूला धूळ चारून विजय संपादन केले. या विजयी चमूत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे व इतर पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश होता. तीन दिवसीय स्पर्धांमध्ये पुरूष सांघिक खेळात फुटबॉल, हॉकी, हँडबॉल, व्हॉलिबॉल, खो- खो, कबड्डी आदींचा समावेश होता तर महिला सांघिक क्रीडा स्पर्धांमध्ये बॉस्केटबॉल, हॉलिबॉल, खो-खो, कबड्डी आदींचा समावेश होता. विविध स्पर्धेतील विजेत्यांना जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गौरविण्यात आले.

Web Title: Rugby:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.