मृत्यू व निपुत्रिक हाेण्याच्या अफवांमुळे लसीकरणात खाेडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 05:00 AM2021-05-31T05:00:00+5:302021-05-31T05:00:18+5:30

प्रत्येक प्राथमिक आराेग्य केंद्रावर कायम स्वरूपी लसीकरण केंद्र ठेवण्यात आले आहे. तसेच माेठ्या गावांमध्ये शिबिर घेतले जात आहे. मात्र, गावात लसीकरण केंद्र असूनही व लस माेफत दिली जात असतानाही काही गावांमध्ये लसीकरणाविषयी चुकीच्या अफवा पसरल्या असल्याने अनेक नागरिक स्वत:हून लसीकरणासाठी पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लसीकरणाची गती पाहिजे त्या प्रमाणात वाढत नसल्याचे दिसून येत आहे.

Rumors of death and infertility are rife | मृत्यू व निपुत्रिक हाेण्याच्या अफवांमुळे लसीकरणात खाेडा

मृत्यू व निपुत्रिक हाेण्याच्या अफवांमुळे लसीकरणात खाेडा

googlenewsNext
ठळक मुद्देजागृतीसाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : काेराेना प्रतिबंधात्मक लस घेतल्यास व्यक्तीचा मृत्यू हाेते, मूल हाेत नाही, शरीर आणखी कमजाेर हाेते, अशा चुकीच्या अफवा पसरल्या असल्याने गावात लसीकरण केंद्र असूनही नागरिक लसीकरण करून घेण्यासाठी पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. या नागरिकांच्या शंका दूर करताना प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. 
काेराेना साथ राेखण्यासाठी लसीकरण करणे हाच प्रभावी उपाय असल्याने जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण हाेईल यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. प्रत्येक प्राथमिक आराेग्य केंद्रावर कायम स्वरूपी लसीकरण केंद्र ठेवण्यात आले आहे. तसेच माेठ्या गावांमध्ये शिबिर घेतले जात आहे. मात्र, गावात लसीकरण केंद्र असूनही व लस माेफत दिली जात असतानाही काही गावांमध्ये लसीकरणाविषयी चुकीच्या अफवा पसरल्या असल्याने अनेक नागरिक स्वत:हून लसीकरणासाठी पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लसीकरणाची गती पाहिजे त्या प्रमाणात वाढत नसल्याचे दिसून येत आहे. ग्रामसेवक, तलाठी, आराेग्य सेवक यांच्यामार्फत गावातील प्रत्येक लाभार्थ्याच्या नावाची यादी बनवून प्रत्यक्ष घरी जाऊन लसीकरण करण्याचे आवाहन करीत आहेत. तरीही काेही नागरिकांच्या मनातून अफवांचे भूत जात नसल्याने लस घेण्यास तयार हाेत नसल्याचे दिसून येत आहे. अफवांचे पीक प्रामुख्याने दुर्गम भागात अधिक असल्याचे दिसून येत आहे. 

काय आहेत अफवा?

वांझपणा येतो 
काेराेनाची लस घेतल्यास पुरुष असाे की महिला, त्याला भविष्यात मूल हाेत नाही. एखादा नवयुवक लस घेण्यास तयार झाला तरी त्याच्या घरचे इतर वयस्क सदस्य त्याला लस घेऊ देत नाहीत. अविवाहित मुलींना तर लसीकरणासाठी प्रतिबंधच घातला जात आहे. 
काेराेनाची टेस्ट केली जाते 
लस देण्यापूर्वी काेराेना चाचणी केली जाते. काेराेना चाचणी पाॅझिटिव्ह आल्यास त्याला जवळच्या काेविड केअर सेंटरमध्ये किंवा रुग्णालयात भरती केले जाते, अशी अफवा आहे.
शरीर कमजाेर हाेेते 
काेराेनाची लस घेतल्यानंतर ताप येतो. हे शरीर कमजाेर हाेण्याची लक्षणे आहेत. शरीरात अनेक बदल घडून येतात. हाडे दुखण्याचा त्रास सुरू हाेतो, अशी अफवा पसरली असल्याने नागरिक लस घेण्यास तयार हाेत नाही.

गावकरी काय म्हणतात?

काेराेना लसीबाबत नागरिक सांगतात ते खरे मानायचे की कर्मचारी सांगतात ते खरे मानायचे, असा प्रश्न आहे. आमच्या गावातच दवाखान्यात लसीकरण केंद्र आहे. मात्र, आमच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीने लस घेतली नाही. कर्मचारी सांगत आहेत. तर लस घेण्याचा विचार सुरू आहे. 
-गावकरी 

नागरिकांमध्ये याेग्य ती जागृती करण्याची जबाबदारी ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक या स्थानिक स्तरावरील कर्मचाऱ्यांची आहे. मात्र, हे कर्मचारी काेराेनाच्या नावाखाली गावात येतच नाहीत. केवळ आराेग्य कर्मचारी लसीकरणाचा डबा धरून येतात. मात्र, नागरिक लसीकरणासाठी येत नाहीत. काही निवडक नागरिक येतात.  त्यांना लस दिली जाते. त्यामुळेेच अनेक गावांमध्ये २५ टक्के नागरिकांचेसुद्धा लसीकरण झालेले नाही. 
-संदीप कुळमेथे, नागरिक 

 

Web Title: Rumors of death and infertility are rife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.