धावपटू प्रियांका ओकसा हिचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:27 AM2021-05-29T04:27:21+5:302021-05-29T04:27:21+5:30
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३८ वी जयंती निमित्त युवा धावपटू प्रियांका लालसू ओकसा हिच्या हस्ते सावरकर यांचे प्रतिमेस पुष्पहार ...
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३८ वी जयंती निमित्त युवा धावपटू प्रियांका लालसू ओकसा हिच्या हस्ते सावरकर यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षल प्रभावित मल्लमपोडुर येथील गरीब आदिवासी कुटुंबात जन्मलेली प्रियांका हिने सर्व अडचणींवर मात करीत स्वकर्तृत्वाने भारतीय क्रीडा प्राधिकरण, औरंगाबाद येथे धावणे या क्रीडाप्रकारासाठी स्थान मिळवले आहे. ती औरंगाबाद येथील ज्ञानेश्वर विद्यालय येथे ९ वीत शिकत असून प्रियांकाने आजपावेतो अनेक राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय धावण्याच्या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा जिंकून गडचिरोलीचे व पर्यायाने देशाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन उपपोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अविनाश नळेगावकर यांनी केले. कोरोना महामारीमुळे प्रियांका ही स्वगावी परतली असून घरी राहूनच तिला पुढील वर्गाचा अभ्यास करता यावा याकरिता उपपोलीस स्टेशनतर्फे पुस्तके भेट स्वरूपात देण्यात आली.
यावेळी लाहेरीचे सरपंच पिंडा बोगामी, अलदांडीचे सरपंच अविनाश मोहंदा तसेच पाेलीस अधिकारी, अंमलदार हजर होते.