ग्रामीण भागात स्वयंपाक पुन्हा चुलीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:43 AM2021-09-14T04:43:22+5:302021-09-14T04:43:22+5:30
ग्रामीण भागात गॅस सिलिंडरचा वापर वाढला हाेता. घरोघरी चुली पेटविल्या जात नाहीत, तर काही घरी चुली हद्दपार झाल्या हाेत्या. ...
ग्रामीण भागात गॅस सिलिंडरचा वापर वाढला हाेता. घरोघरी चुली पेटविल्या जात नाहीत, तर काही घरी चुली हद्दपार झाल्या हाेत्या. ग्रामीण भागात महिला व पुरुष वर्षभरापासून परिसरातून सरपण जमा करत होते. गॅस मिळाल्याने तेही बंद झाले, पण पुन्हा अजून सरपण गोळा करण्याची वेळ आली आहे. स्वयंपाक गॅसवर, तर अंघोळीकरिता लागणारे गरम पाणी गॅसवरच गरम करण्यात येत होते. ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर कुटुंबीयांचे आर्थिक बजेट, वीज बिल आणि सिलिंडरमुळे पूर्णतः गरिबांचे बजेट कोलमडले आहे.
सततची नापिकी व कोरोनामुळे अनेक कुटुंबांना रोजगारापासून दूर राहावे लागत आहे. रोजगारासाठी भटकंती, साहित्यामध्ये दरवाढ, तर कामामध्ये मात्र वेतन कमी असल्याने नागरिकांना महागडा गॅस परवडणार काय ? महागाई गगनाला भिडत आहे. त्यामुळे सिलिंडर घेणे अनेक कुटुंबीयांना अशक्य झाले आहे. येत्या उन्हाळ्यात ग्रामीण भागातील महिलांच्या डोक्यावर सरपणाची मोळी दिसणार आहे. महिलांसोबत पुरुषही परिसरातून सरपण गोळा करून सायकलद्वारे आणत असल्याचे चित्र लवकरच दिसून येणार आहे.
130921\img_20210905_100158.jpg
सायकल द्वारे सरपणा जमा करून नेताना