ग्रामीण भागात माेहफूल दारू गाळणे बनला कुटीर उद्याेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:35 AM2021-03-20T04:35:55+5:302021-03-20T04:35:55+5:30

मानापूर, देलनवाडी : आरमाेरी तालुक्याच्या ग्रामीण भागात मुक्तिपथच्या माध्यमातून दारूबंदीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. मात्र ‘शिमग्याची बाेंब दाेन ...

In rural areas, the distillery has become a cottage industry | ग्रामीण भागात माेहफूल दारू गाळणे बनला कुटीर उद्याेग

ग्रामीण भागात माेहफूल दारू गाळणे बनला कुटीर उद्याेग

Next

मानापूर, देलनवाडी : आरमाेरी तालुक्याच्या ग्रामीण भागात मुक्तिपथच्या माध्यमातून दारूबंदीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. मात्र ‘शिमग्याची बाेंब दाेन दिवस’ या उक्तीप्रमाणे माेहफूल दारू विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. माेहफुलाची दारू गाळणे हा ग्रामीण भागातील सध्या कुटीर उद्याेग बनला आहे. तंटामुक्त समित्याकडे अधिकार असला तरी व्यसनमुक्तीसाठी या समित्या प्रभावीरीत्या काम करताना दिसून येत नाही. माेहफुलाची दारू गाळून त्याची चिल्लर व ठाेक विक्री केली जात आहे. एकीकडे काेराेनाचा कहर, दुसरीकडे राेजगाराची वानवा अशा स्थितीत नगदी व फायदेशीर व्यवसाय म्हणून अनेकांनी घरबसल्या माेहफूल दारू गाळण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. काेराेनामुळे अनेक व्यवसाय बंद पडले. हजाराे लाेकांचा राेजगार हिरावला. परिणामी बेराेजगार युवकही या व्यवसायाकडे वळल्याचे दिसते.

Web Title: In rural areas, the distillery has become a cottage industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.