‘महाज्याेती’अंतर्गत मिळणार करडई बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:43 AM2021-09-24T04:43:00+5:302021-09-24T04:43:00+5:30

कार्यक्रमाला सरपंच प्रशाला गेडाम, मंडल कृषी अधिकारी रूपेश मेश्राम, कृषी पर्यवेक्षक भूषण देशमुख, कृषी सहायक श्रीकांत ठवरे, विनोद वझाडे, ...

Safflower seeds are available under 'Mahajayati' | ‘महाज्याेती’अंतर्गत मिळणार करडई बियाणे

‘महाज्याेती’अंतर्गत मिळणार करडई बियाणे

Next

कार्यक्रमाला सरपंच प्रशाला गेडाम, मंडल कृषी अधिकारी रूपेश मेश्राम, कृषी पर्यवेक्षक भूषण देशमुख, कृषी सहायक श्रीकांत ठवरे, विनोद वझाडे, भाग्यश्री दमकोंडावार, कोंढाळा तंटामुक्त समिती अध्यक्ष उमेश राऊत, कृषिमित्र नागोराव उके, अविनाश राऊत, ताराचंद मेश्राम, ईश्वर दुपारे, दत्तू तुपट, विकास मोहुर्ले, भास्कर पत्रे व गावातील शेतकरी उपस्थित होते.

बाॅक्स

अशी आहे याेजना...

महाज्याेतीअंतर्गत करडई बियाणांचा लाभ जिल्ह्यात केवळ देसाईगंज व आरमाेरी तालुक्यातील ओबीसी, व्हीजे, एनटी, एसबीसी प्रवर्गातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. या प्रवर्गातील शेतकऱ्यांना करडई लागवडीकरिता प्रोत्साहन म्हणून प्रति एकर २ हजार २०० रुपये निविष्ठांकरिता मिळणार आहेत. यामध्ये क्लस्टर धर्तीवर करडई लागवड राबविणे अपेक्षित आहे. गावातील गट, कंपनी व वैयक्तिक शेतकरी लागवड करू शकतात. गूगल फाॅर्मवर शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह नाेंदणी करावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

220921\32581511-img-20210922-wa0003.jpg

मार्गदर्शन करताना गेडाम

Web Title: Safflower seeds are available under 'Mahajayati'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.