धानोरात स्पर्धांना सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Published: March 13, 2016 01:29 AM2016-03-13T01:29:24+5:302016-03-13T01:29:24+5:30
लोकमत सखी मंच शाखा धानोराच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
धानोरा : लोकमत सखी मंच शाखा धानोराच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उद्घाटन ताराबाई कुनघाडकर यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी नुरझा पिराणी होत्या. कार्यक्रमाला नेत्रा साळवे, नंदा रामपूरकर, धारा जांभुळकर, मंगला चंदेल, अल्का साळवे, किरण बर्वे, शेवंता थूल, सुमन बोरीकर, लोखंडे, विभा धाईत, सविता श्रीपदवार उपस्थित होत्या.
रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक कल्पना पुरी, गीतगायनमध्ये प्रथम क्रमांक रेखा घाटे यांनी पटकाविला. या स्पर्धेत प्रथम बक्षीस धारा जांभुळकर यांच्या हस्ते देण्यात आले. दरम्यान उपस्थित ७० सखींमधून चार लकी ड्रा काढण्यात आला. यात प्रथम क्रमांक शर्मिला भरकर, द्वितीय चेतना गुरनुले, तृतीय क्रमांक सविता लेनगुरे, चतुर्थ क्रमांक शर्मिला मशाखेत्री यांनी पटकाविला. विजेत्यांना अनुक्रमे अनंत साळवे, नरेश बोडगेवार, राजेश जांभुळकर, सुनंदा कुळमेथे यांच्याकडून भेटवस्तू देण्यात आल्या.
सदस्य नोंदणी करणाऱ्या ७० सखींना इतर साहित्य वितरित करण्यात आले. संचालन ज्योती उंदीरवाडे तर आभार रंजना गडपाडे, चेतना गुरनुले यांनी मानले. विद्यादास अनिता चंदेल, जयमाला उंदीरवाडे, अर्चना बोडगेवार, भावना मशाखेत्री, वैशाली धाईत, अश्विनी किरंगे, अनिता चंदेल, वैष्णवी राऊत, स्वर्णमाला सहारे, मीता चंदेल, जास्वंदा चंदेल, राऊत, अंतकला कोडापे, संगीता सरोदे, आशा शेबे, वैशाली म्हशाखेत्री, चंदा शेडमाके, अनिता तुमराम, अश्विनी अलोणे, ताराबाई कोटांगले, अल्का बुराडे, हेमा दास, नीमा रामपूरकर, भारती सहारे, संगीता वाघाडे, कीर्ती खरवडे यांनी सहकार्य केले.
सखी मंच नवीन सदस्य नोंदणीसाठी ३५० व जुन्या सदस्यांसाठी ३०० रूपये शुल्क ठेवण्यात आले आहे. २०१५ या वर्षातील ओळखपत्र सखींनी जमा करून १५ मार्चपर्यंत नोंदणी व नूतनीकरण करावे, असे आवाहन सखी मंच तालुका संयोजिका ज्योती उंदीरवाडे यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)