पाेलीस व लोकसहभागातून साकारला बहूद्देशीय तलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:27 AM2021-06-01T04:27:24+5:302021-06-01T04:27:24+5:30

ताडगाव पोलीस मदत केंद्राच्या पथकाने केडमारा गावास दिलेल्या ग्रामभेटीदरम्यान ग्रामस्थांनी पाणी तसेच शेतीसाठी सिंचनाची टंचाई असल्याबाबत समस्या मांडली. पोलीस ...

Sakarla Multipurpose Lake through Paelis and public participation | पाेलीस व लोकसहभागातून साकारला बहूद्देशीय तलाव

पाेलीस व लोकसहभागातून साकारला बहूद्देशीय तलाव

googlenewsNext

ताडगाव पोलीस मदत केंद्राच्या पथकाने केडमारा गावास दिलेल्या ग्रामभेटीदरम्यान ग्रामस्थांनी पाणी तसेच शेतीसाठी सिंचनाची टंचाई असल्याबाबत समस्या मांडली. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या नेतृत्वात केडमारा गावातील पाणी समस्या सोडविण्याचा निर्णय पोलीस मदत केंद्र ताडगावचे प्रभारी अधिकारी पो.उप.नि सौरभ पिंगळे यांनी घेतला. सदर समस्येवर शाश्वत व बहूद्देशीय उपाय शोधला, तो म्हणजे गावाला एक मोठा तलाव बांधून देणे. ग्रामस्थांची बैठक घेऊन पोलीस व लोकसहभागातून तलाव बांधण्याचे ठरले. त्यानुसार, पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत केडमारा गावाजवळील जुन्या गावतलावाचे खोलीकरण, रूंदीकरण करण्यात आले, तसेच उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध रहावे, यासाठी तलावात मोठा हौद खाेदण्यात आला. ज्यात गावकऱ्यांना मत्स्यशेतीद्वारे पर्यायी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. भविष्यात भूजल पातळीतील वाढ होऊन पेयजलाची समस्या दूर होण्यास मदत हाेणार आहे. उन्हाळ्यात परिसरातील वन्य प्राणी, पशू-पक्ष्यांना पाण्याचा एक शाश्वत स्रोत उपलब्ध झाला आहे. अशा पद्धतीचा पोलीस प्रशासन व लोकसहभाग अभिनव उपक्रमातून गावासाठी तलाव तयार झाला आहे. गावाचा ‘शाश्वत विकास' साधला जात आहे. यासाठी पो.उप.नि. सयाम, पोउपनि अहिरे, पोलीस अमलदार रमेश तेलामी, प्रमोद शेकोकार, देवेंद्र अंबादे, विष्णू पोले आदींनी मेहनत घेतली.

===Photopath===

300521\0430img-20210530-wa0010.jpg

===Caption===

उद्घाटन करताना

Web Title: Sakarla Multipurpose Lake through Paelis and public participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.