६३ एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ मान्य; ६३७ जणांना अमान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2021 05:00 AM2021-12-03T05:00:00+5:302021-12-03T05:00:40+5:30
एसटीचा संप सुरू झाल्यावर काही दिवस प्रवाशांना अडचण झाली. मात्र, प्रत्येक समस्येवर उपाय असतो. त्याचप्रमाणे नागरिकांनी आता उपाय शाेधला आहे. खासगी प्रवासी वाहनांची संख्यासुद्धा वाढली आहे. त्यामुळे आता नागरिक प्रवासासाठी एसटीऐवजी खासगी वाहनांची प्रतीक्षा करीत आहेत. एसटीचा संप सुरू असल्याने खासगी वाहनधारक सुरुवातीला जास्तीचे तिकीट आकारत हाेते. आता मात्र तेही एसटीएवढेच तिकीट आकारतात.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर ताेडगा काढण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात तीन हजार ते पाच हजार रुपयांपर्यंतची वाढ केली आहे. वेतनवाढीनंतर एसटी कर्मचारी संप मागे घेऊन कामावर रुजू हाेतील, अशी अपेक्षा हाेती. मात्र, संपकरी कर्मचारी कामावर रुजू झाले नसले तरी काही कर्मचारी व प्रशासकीय अधिकारी अजूनही काम करीत आहेत. शासनाने दिलेल्या वेतनवाढीवर ते समाधानी आहेत. गडचिराेली आगारातील एकूण ४४५ कर्मचाऱ्यांपैकी ४५ कर्मचारी नियमित काम करीत आहेत. तर, ४०० कर्मचारी संपावर आहेत. अहेरी आगारातील २५५ कर्मचाऱ्यांपैकी १८ कर्मचारी संपात नाहीत. २३७ कर्मचारी संपावर आहेत.
खासगी वाहनांची सवय लागली; बसस्थानकाकडे प्रवासी फिरकेना
एसटीचा संप सुरू झाल्यावर काही दिवस प्रवाशांना अडचण झाली. मात्र, प्रत्येक समस्येवर उपाय असतो. त्याचप्रमाणे नागरिकांनी आता उपाय शाेधला आहे. खासगी प्रवासी वाहनांची संख्यासुद्धा वाढली आहे. त्यामुळे आता नागरिक प्रवासासाठी एसटीऐवजी खासगी वाहनांची प्रतीक्षा करीत आहेत. एसटीचा संप सुरू असल्याने खासगी वाहनधारक सुरुवातीला जास्तीचे तिकीट आकारत हाेते. आता मात्र तेही एसटीएवढेच तिकीट आकारतात. काही जण तर त्यापेक्षा कमी तिकीट आकारतात. एसटी कर्मचाऱ्यांना किती दिवस संप करायचा आहे, ते त्यांनी करावा. संपाचा फारसा फरक पडणार नाही.
- प्रशांत देशमुख, प्रवासी
विलीनीकरणाची बाब न्यायालयात गेली आहे. न्यायालयाचा निर्णय लागण्यास कित्येक वर्षे लागू शकतात. ताेपर्यंत एसटी कर्मचारी संप करणार असतील, तर एसटी आपाेआप बुडून जाईल व एसटी कर्मचाऱ्यांच्या हातचा राेजगारही हिरावला जाईल. राेजगार जाईल तेव्हा एसटी कर्मचाऱ्यांना राेजगाराची किंमत काय हाेती, ते कळेल. मात्र, एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर अडून बसले आहेत. शासनाने काही प्रमाणात चालक व वाहकांची भरती करण्यास काहीच हरकत नाही. राज्यातील बेराेजगारांना यातून राेजगार मिळेल व नागरिकांची समस्यासुद्धा सुटण्यास मदत हाेईल.
- विकास लाडे, प्रवासी