दहा वर्षांपासून एकच मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:37 AM2021-05-18T04:37:40+5:302021-05-18T04:37:40+5:30
सन २००९-२०१० या वर्षात ४३ लाख रुपये खर्च करून सती नदीच्या पात्रात वैरागड-कढाेली मार्गावरील मोठ्या पुलाच्या जवळ कढोली येथील ...
सन २००९-२०१० या वर्षात ४३ लाख रुपये खर्च करून सती नदीच्या पात्रात वैरागड-कढाेली मार्गावरील मोठ्या पुलाच्या जवळ कढोली येथील योजनेच्या विहिरीच्या खालील भागात बंधारा बांधण्यात आला आहे. उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेता या बंधाऱ्यामुळे नदीपात्रातील जलसाठा कायम राहून त्याचा फायदा नळ योजनेला होईल असा उद्देश हाेता. मात्र बंधाऱ्याचे बांधकाम झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी पुराच्या पाण्याच्या प्रवाहाने हा बंधारा तुटला. तुटलेला बंधारा नदीपात्रामध्ये असल्याने पावसाळ्यात नदीला येणारे पाणी बंधाऱ्याला आपटते. आणि नदी नदीकाठाने नवा प्रवाह निर्माण करते. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात नदीकाठ वाहून जात आहे. नदीकाठच्या शेतकऱ्यांची दरवर्षी फार मोठी हानी होते. पण याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.