रेतीघाटातून महसूल मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:19 AM2019-07-27T00:19:22+5:302019-07-27T00:19:59+5:30
दुसऱ्या फेरीतील रेतीघाट लिलाव प्रक्रियेसाठी कार्यवाही जिल्हा खनिकर्म विभागाच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. दुसऱ्या फेरीतील २३ रेतीघाटांसाठी मागविण्यात आलेली ई-निविदा आॅनलाईन पद्धतीने ३१ जुलै रोजी उघडण्यात येणार आहे. यातून प्रशासन व शासनाला कोट्यवधीचा महसूल मिळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दुसऱ्या फेरीतील रेतीघाट लिलाव प्रक्रियेसाठी कार्यवाही जिल्हा खनिकर्म विभागाच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. दुसऱ्या फेरीतील २३ रेतीघाटांसाठी मागविण्यात आलेली ई-निविदा आॅनलाईन पद्धतीने ३१ जुलै रोजी उघडण्यात येणार आहे. यातून प्रशासन व शासनाला कोट्यवधीचा महसूल मिळणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात नदी, नाल्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रेतीघाटांची संख्याही बºयापैकी आहे. मध्यंतरीच्या काळात रेतीघाटाची लिलाव प्रक्रिया लांबल्याने जिल्ह्यात रेतीचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने गतीने कार्यवाही करून लिलावाची पहिली फेरी पार पाडण्यात आली. या फेरीत ३१ रेतीघाट ठेवण्यात आले होते. यापैकी २६ रेती घाटांचा लिलाव झाला. आता रेतीघाट लिलावाची दुसरी फेरी आॅनलाईन पद्धतीने राबविली जात आहे. या फेरीत २३ रेतीघाट ठेवण्यात आले आहे. सदर रेतीघाटातून रेतीचे खनन व वाहतुकीची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत आहे.
तीन हजार ब्रासपर्यंतच्या घाटासाठी तीन महिने किंवा ३० सप्टेंबर यापैकी जे कमी असेल तो कालावधी रेती खननासाठी राहणार आहे. ३००१ ते ४५०० ब्रासपर्यंतच्या घाटासाठी साडेचार महिने किंवा ३० सप्टेंबर २०१९ यापैकी जे कमी असेल त्या कालावधीत खनन करता येणार आहे. ४५०१ ते ६००० ब्रासपर्यंतच्या घाटासाठी सहा महिने किंवा ३० सप्टेंबर २०१९ तसेच ६००१ ब्रास व त्यावरील घाटासाठी ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत संबंधित कंत्राटदारांना रेतीचे खनन करून वाहतूक करता येणार आहे.
दुसºया फेरीतील रेतीघाटाच्या लिलाव प्रक्रियेसाठी १७ जुलैपासून संबंधित कंत्राटदाराकडून रजिस्ट्रेशन स्वीकारण्यास सुरूवात झाली. याच तारखेपासून ई-निविदा आॅनलाईन स्वरूपात स्वीकारण्यात येत आहे. २४ जुलैला निविदाधारकांस आॅनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया बंद झाली. २९ जुलै सायंकाळी ५ वाजेपर्यंत सदर रेतीघाटासाठी ई-निविदा प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ३१ जुलै रोजी ई-निविदा आॅनलाईन पद्धतीने उघडण्यात येणार आहे. सदर रेतीघाटाच्या लिलावातून प्रशासन व शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूूल खनिकर्म विभागामार्फत मिळणार आहे.
हे आहेत लिलावातील रेतीघाट
दुसºया फेरीतील लिलावासाठी २३ रेतीघाट ठेवण्यात आले आहे. यामध्ये अहेरी तालुक्यातील चिचगुंडी, महागाव, आरमोरी तालुक्यातील वनखी, रामपूर चक, कुरखेडा तालुक्यातील नान्ही, मौशी, गडचिरोली तालुक्यातील आंबेशिवणी, गायघाट, विहिरगाव चक, चांदाळा, शिवनी, देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर, अरततोंडी, कोकडी १, कोकडी २, धानोरा तालुक्यातील चिचोली, मिचगाव बुज, जांभळी, बांधोना, मुलचेरा तालुक्यातील गोमणी, मच्छीगट्टा व सिरोंचा तालुक्यातील आरडा माल, अंकिसा माल व मद्दीकुंठा आदींचा समावेश आहे. या सर्व रेतीघाटांची मिळून एकूण अंतिम अप्सेट किंमत चार कोटी तीन लाख रुपये आहे.