रेती वाहतुकीचा ट्रॅक्टर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:43 AM2018-07-20T00:43:13+5:302018-07-20T00:44:52+5:30

वाहतूक परवाना नसताना अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करून १ लाख १२ हजार ९०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सदर कारवाई देसाईगंजच्या तहसीलदारांनी मंगळवारी केली.

Sand trafficking trawler seized | रेती वाहतुकीचा ट्रॅक्टर जप्त

रेती वाहतुकीचा ट्रॅक्टर जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देतहसीलदारांची कारवाई : १ लाख १२ हजार ९०० रूपयांचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : वाहतूक परवाना नसताना अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करून १ लाख १२ हजार ९०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सदर कारवाई देसाईगंजच्या तहसीलदारांनी मंगळवारी केली.
वाहन चालक नानाजी बळीराम बोरकर, रा. शंकरपूर, ता. देसाईगंज हा १७ जुलै रोजी रात्री ८ वाजता देसाईगंज येथील फवारा चौकात ट्रक्टर क्रमांक एमएच ३३ एफ ३३६८ व ट्रॉली क्रमांक एमएच ३३ जी ४०५३ द्वारे ०१ ब्रास रेतीची वाहतूक करीत होता. त्याच्याकडे वाहतूक परवाना नव्हता. त्यामुळे सदर वाहतूक अवैधरित्या केल्याचे सिद्ध झाल्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ नियम ४८(७) व (८) च्या सुधारणेस अनुसरून अनधिकृत गौण खनिज व वाहतुकीच्या कामी वापरलेले ट्रॅक्टर जप्त करण्यात आले.
गैरअर्जदार वाहन चालकाने आपले लेखी बयान सादर केले. त्यानुसार सदर वाहन महादेव नानाजी बुद्धे रा. शंकरपूर यांच्या मालकीचे असल्याचे त्याने कबूल केले. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे नियम ४८ (७) व (८) अन्वये शास्ती म्हणून १ लाख रूपये व गौणखनिजाच्या बाजारमूल्याच्या ५ पट दंड म्हणजेच एकूण १२ हजार ५०० रू. व स्वामित्व धनाची रक्कम ४०० असे एकूण १ लाख १२ हजार ९०० रूपये वसूल करण्याचे आदेश देण्यात आले. सदर रक्कम चालानद्वारे शासन जमा करण्यात यावी व वैयक्तिक जात मुचलका वाहनाच्या बाजारमूल्याच्या किमती एवढ्या रक्कमेचा उपविभागीय अधिकारी, देसाईगंज यांच्याकडून वैयक्तिक जात मुचलका मान्य करून तहसील कार्यालयास सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यावरून तालुक्यात रेतीची अवैैध वाहतूक होत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.

Web Title: Sand trafficking trawler seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.