लोकमत सखी मंच सदस्यांना मिळणार चंदन प्याले
By admin | Published: June 23, 2017 12:53 AM2017-06-23T00:53:39+5:302017-06-23T00:53:39+5:30
जिल्ह्यातील सखी मंच सदस्यांना निकालस अलंकार यांच्यामार्फत चंदन प्यालाचे वितरण २४ ते २९ जूनदरम्यान केले जाणार आहे.
विशेष भेटवस्तू : निकालस अलंकारतर्फे खास भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील सखी मंच सदस्यांना निकालस अलंकार यांच्यामार्फत चंदन प्यालाचे वितरण २४ ते २९ जूनदरम्यान केले जाणार आहे.
देसाईगंज येथे २४ व २५ जून रोजी हटवार मंगल कार्यालयाच्या बाजूला लोकमत सखी मंचच्या तालुका संयोजिका कल्पना कापसे यांच्या घरी सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत चंदन प्यालाचे वितरण केले जाणार आहे. कोरची, कुरखेडा, वैरागड, बेडगाव व देसाईगंज तालुका व शहरातील सखी मंच सदस्यांना चंदन प्यालाचे वितरण केले जाणार आहे.
आरमोरी येथे २५ जूनला ४ ते ७ च्या दरम्यान सायंकाळी चंदनप्यालाचे वितरण तालुका संयोजिका सुनीता तागवान यांच्या घरी करण्यात येईल. आरमोरी येथील सर्व सखींनी याचा लाभ घ्यावा.
आलापल्ली येथील ग्लोबल मीडिया इंग्लिश मीडियम स्कूल येथे २६ व २७ जून रोजी एटापल्ली, अहेरी, मुलचेरा येथील सदस्यांना चंदन प्यालाचे वितरण केले जाणार आहे. यासंदर्भात आलापल्लीच्या संयोजिका शिल्पा कोंडावार यांच्याशी संपर्क साधावा.
चामोर्शी येथे सायंकाळी ४ ते ७ पर्यंत चंदन प्यालाचे वितरण करण्यात येईल. घोट, आष्टी, चामोर्शीच्या सखींनी नोंद घ्यावी. तालुका संयोजिका चैताली चांदेकर यांच्याशी संपर्क साधावा.
गडचिरोली येथे २८ व २९ जून रोजी लोकमत कार्यालय गडचिरोली येथे नवेगाव, धानोरा येथील सखी मंच सदस्यांना चंदन प्यालाचे वितरण केले जाणार आहे. अधिक माहितीकरिता लोकमत सखी मंच जिल्हा संयोजिका रश्मी आखाडे (९६३७९५२६०६) यांच्याशी संपर्क साधावा.
नियोजित तारखेनंतर चंदन प्यालाचे वितरण केले जाणार नाही. त्यामुळे नियोजित वेळेत जास्तीत जास्त सखी मंच सदस्यांनी चंदन प्यालाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सखी मंचच्या वतीने करण्यात आले आहे.