५ कोटींची संजीवनी

By admin | Published: August 6, 2014 11:50 PM2014-08-06T23:50:58+5:302014-08-06T23:50:58+5:30

वीज बिल थकीत असलेल्या शेतकऱ्यांना ५० टक्के सुट देणारी कृषी संजीवनी योजना राज्यशासनाने सुरू केली असून या योजनेचा लाभ गडचिरोली जिल्ह्यातील १३ हजार २६८ कृषीपंप धारकांना होणार आहे.

Sanjivani 5 crores | ५ कोटींची संजीवनी

५ कोटींची संजीवनी

Next

कृषी संजीवनी योजना : ८ कोटी ६५ लाख थकीत
गडचिरोली : वीज बिल थकीत असलेल्या शेतकऱ्यांना ५० टक्के सुट देणारी कृषी संजीवनी योजना राज्यशासनाने सुरू केली असून या योजनेचा लाभ गडचिरोली जिल्ह्यातील १३ हजार २६८ कृषीपंप धारकांना होणार आहे. यातून जवळपास ५ कोटी रूपयाची रक्कम माफ केली जाणार आहे.
दरवर्षी पडणार ओला किंवा कोरडा दुष्काळ, खर्चाच्या तुलनेत उत्पादन कमी झाल्याने शेतकरी नेहमीच अडचणीत येतात. उत्पन्नच न झाल्याने मागील अनेक वर्षापासून कृषीपंपाचे वीजबिल राज्यातील लाखो शेतकऱ्यांकडे थकीत आहे. वीजबिल न भरल्याने महावितरण कंपनीने सदर शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित केला आहे. अशा शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी राज्य शासनाने कृषी संजीवनी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत वीजबिलाच्या मुद्दलापैकी ५० टक्के रक्कम शेतकऱ्याने भरल्यास उर्वरित ५० टक्के मुद्दल राज्यसरकार भरणार आहे. दंड व व्याजाची रक्कमसुध्दा माफ केली जाणार आहे. यासाठी संबंधित शेतकऱ्याला त्याच्याकडे थकीत असलेल्या रकमेपैकी २० टक्के रक्कम ३१ आॅगस्टपूर्वी, २० टक्के रक्कम ३० सप्टेंबरपूर्वी व उर्वरित १० टक्के रक्कम ३१ आॅक्टोंबरपूर्वी भरायची आहे. थकबाकी भरल्यानंतर तसेच १ एप्रिल २०१४ नंतरचे बिल नियमितपणे भरले असेल तर थकबाकीची ५० टक्के रक्कम शासन भरणार आहे. व्याज व दंडसुध्दा माफ करणार आहे. नियमितपणे वीजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांचे पुढील ६ महिन्याचे बिल शासन भरणार आहे.गडचिरोली जिल्ह्यात एकुण १८ हजार १०७ कृषीपंपधारक शेतकरी आहेत. यापैकी १३ हजार २६८ शेतकऱ्यांकडे ८ कोटी ६५ लाख रूपयांची थकबाकी आहे. या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला तर त्यांना ४ कोटी ३२ लाख ५० हजाराची सवलत मिळणार आहे. ४ हजार ८३९ शेतकरी वीजबिलांचा भरणा नियमितपणे करीत आहे. त्यांचे ६ महिन्यांचे वीजबिल माफ केले जाणार आहे. असे एकुण जवळपास ५ कोटींचे वीजबिल माफ होणार आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Sanjivani 5 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.