अंगणवाडी मदतनिसांना साडीचोळी भेट व सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:25 AM2021-06-26T04:25:28+5:302021-06-26T04:25:28+5:30
आलापल्ली: अहेरी तालुका मुख्यालयापासून ४५ किमी अंतरावर असलेल्या जिमलगट्टा येथे देचलीपेठा सर्कलमधील संपूर्ण अंगणवाडी मदतनिसांना ज्येष्ठ पौर्णिमा व आगामी ...
आलापल्ली: अहेरी तालुका मुख्यालयापासून ४५ किमी अंतरावर असलेल्या जिमलगट्टा येथे देचलीपेठा सर्कलमधील संपूर्ण अंगणवाडी मदतनिसांना ज्येष्ठ पौर्णिमा व आगामी वर्षावासाचे औचित्य साधून धनश्री ग्रुप आलापल्लीतर्फे साडी-चोळी भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
अहेरी तालुक्यातील देचलीपेठा हा आदिवासी बहुल अतिदुर्गम व मागासलेल्या भागामध्ये अंतर्भूत आहे. या भागात नोकरी करणे म्हणजे युद्धपातळीवरील काम आहे. पावसाळ्यात तर या भागातील लोकांचा नदी, नाल्यामुळे चार महिने जगाशी संपर्क तुटते. या परिसरात निरक्षरतेचे प्रमाण अधिक आहे. अशा परिस्थितीतही अंगणवाडी सेविका व मदतनीस मुलांना गोळा करून शिकवण्याचं काम करतात हे कौतुकच. तसेच काेराेना कालावधीत अतिशय उत्तमरितीने अंगणवाडी मदतनिसांनी जबाबदारी सांभाळली आहे. याची दखल घेत धनश्री ग्रुपचे मुख्य संचालक राजअनिल पोचमपल्लीवार व सहसंचालक गौरव भगत यांच्याकडून ज्येष्ठ पौर्णिमा व आगामी वर्षावासाचे औचित्य साधून देचलीपेठा सर्कल येथील संपूर्ण अंगणवाडी मदतनीस यांचा साडी-चोळी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी देचलीपेठा सर्कल येथील पर्यवेक्षिका सुशीला भगत तसेच पूर्ण अंगणवाडी मदतनीस उपस्थित होत्या.
===Photopath===
250621\1740-img-20210625-wa0004.jpg
===Caption===
धनश्री ग्रुप तर्फे सत्कार