जमा-खर्चाचा हिशेब दिल्याशिवाय सरपंच, उपसरपंचाची निवड नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:34 AM2021-02-12T04:34:29+5:302021-02-12T04:34:29+5:30

लाेेकमत न्यूज नेटवर्क काेरची : स्थानिक पंचायत समितीअंतर्गत बाेरी ग्रामपंचायतीमध्ये सन २०१५ ते २०२० या पाच वर्षांच्या कालावधीत शासकीय ...

Sarpanch and Deputy Sarpanch are not selected without giving an account of the expenditure | जमा-खर्चाचा हिशेब दिल्याशिवाय सरपंच, उपसरपंचाची निवड नाही

जमा-खर्चाचा हिशेब दिल्याशिवाय सरपंच, उपसरपंचाची निवड नाही

Next

लाेेकमत न्यूज नेटवर्क

काेरची : स्थानिक पंचायत समितीअंतर्गत बाेरी ग्रामपंचायतीमध्ये सन २०१५ ते २०२० या पाच वर्षांच्या कालावधीत शासकीय याेजनांमधून विविध विकासकामे झाली आहेत. ग्रामस्थांनी आमसभेत मागितलेल्या या कामांच्या जमा-खर्चाचा हिशेब ग्रामपंचायतीने नागरिकांपुढे ठेवल्याशिवाय सरपंच व उपसरपंचाची निवडणूक हाेऊ देणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.

यासंदर्भात अतिरिक्त जिल्हाधिकारी साेनप्पा यमगार यांना ९ फेब्रुवारीला निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथील आय बी ग्रुपतर्फे पोल्ट्री फार्मचे बांधकाम काेट्यवधी रुपयांतून बाेरी येथे सुरू आहे. मात्र या कामात ग्रामस्थांना विश्वासात घेण्यात आले नाही. ग्रा. पं. प्रशासनाने संबंधित ग्रुपला गुप्तपणे नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे.

या पोल्ट्री फार्ममुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. या ग्रामपंचायतमधील पाणीपुरवठा अंतर्गत योजना सन २०१९-२० मध्ये नळ पाइपलाइनचे काम करण्यात आले. मात्र गावातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. राेहयाेअंतर्गत वृक्षाराेपणासाठी खड्डे खाेदण्यात आले. मात्र हे खड्डे लागवडीअभावी जैसे थे आहेत.

ग्रामपंचायतीला शासनाकडून मिळणाऱ्या सर्वच निधीचा हिशेब सरपंचाच्या निवडणुकीपूर्वी ग्रामस्थांना देण्यात यावा, अन्यथा सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक हाेऊ देणार नाही, असे म्हटले आहे. दरम्यान, गावकऱ्यांनी ग्रामपंचायतमधील झालेल्या कामांचा हिशोब ग्रामसेवक एस.जी. मडावी यांना अनेकदा मागितला. मागील पाच वर्षांपासून होणाऱ्या प्रत्येक आमसभेत हिशेब देण्यास टाळाटाळ करण्यात आली. पुढच्या सभेत हिशेब नक्की देणार, असे सांगून ग्रामसेवकांनी वेळ मारून नेली. शेवटी ग्रामसेवक मडावी यांची येथून इतरत्र बदली झाली. मात्र ग्रामस्थांना अजूनपर्यंत हिशेब मिळाला नाही. सरपंच निवडीपूर्वी हिशेब देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Sarpanch and Deputy Sarpanch are not selected without giving an account of the expenditure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.