१४ ग्रामपंचायतींवर सरपंच व उपसरपंच विराजमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:35 AM2021-02-14T04:35:08+5:302021-02-14T04:35:08+5:30
वघाळा ग्रामपंचायतच्या सरपंचपदी मिथुन प्रधान तर उपसरपंचपदी पुष्पा अनोले, सायगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शीतल धोटे तर उपसरपंचपदी मनोज पांचलवार, इंजेवारी ...
वघाळा ग्रामपंचायतच्या सरपंचपदी मिथुन प्रधान तर उपसरपंचपदी पुष्पा अनोले, सायगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शीतल धोटे तर उपसरपंचपदी मनोज पांचलवार, इंजेवारी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी अल्का कुकडकर तर उपसरपंचपदी मंगेश पासेवार, ठाणेगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी वासुदेव मंडलवार तर उपसरपंचपदी स्नेहा भांडेकर, वडधा ग्रामपंचायतच्या सरपंचपदी प्रिया गेडाम तर उपसरपंचपदी विलास सेलोटे, मोहझरी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी मयुर कोडाप तर उपसरपंचपदी संतोष निकुरे, भाकरोंडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी विलास उसेंडी तर उपसरपंचपदी दिगंंबर राऊत, देलनवाडी ग्रामपंचायत सरपंचपदी शुभांगी मसराम तर उपसरपंचपदी त्रिलोक गावतुरे, वासाळा ग्रामपंचायतच्या सरपंचपदी रत्नमाला सेलोटे तर उपसरपंचपदी उज्ज्वला मंगरे, डोंगरसावंगी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सुलभा गेडाम तर उपसरपंचपदी टिकाराम नारनवरे, कुरंडीमाल ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सुनंदा मडावी तर उपसरपंचपदी शारदा मडावी, शिवनी (बु.) ग्रामपंचायतच्या सरपंचपदी पुरुषोत्तम दोनाडकर तर उपसरपंचपदी सुरेश ढोरे, मानापूर ग्रामपंचायतच्या सरपंचपदी कुंता दुर्गादास नारनवरे तर उपसरपंचपदी वैशाली रंजित खुणे यांची तर जोगीसाखरा ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी संदीप ठाकूर यांची निवड करण्यात आली. जोगीसाखरा येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदासाठी एकाही सदस्याने अर्ज सादर न केल्याने सरपंचपद रिक्त ठेवण्यात आले आहे. सरपंचपदाची निवडणूक पार पडल्यानंतर विजयी उमेदवारांनी जल्लाेष केला.
बाॅक्स
१५ ग्रामपंचायतीत १५ ला निवडणूक
वैरागड, कासवी, पळसगाव, देलोडा(बु.), डोंगरगाव(भु.), चामोर्शी(माल), कोरेगाव, चुरमुरा, देऊळगाव, कुलकुली, सिर्सी, पिसेवडधा, शंकरनगर, बोरीचक, किटाळी या १५ ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक १५ फेब्रुवारीला होणार आहे.