नाली उपसाच्या बिलासाठी स्वीकारली लाच, सरपंच व सदस्य एसीबीच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 11:12 AM2023-04-12T11:12:07+5:302023-04-12T11:13:57+5:30
सरपंच व सदस्याने मागितली पाच हजार रुपयांची लाच
गडचिराेली : नाली सफाई करण्याच्या कामाचे बिल देण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या अमिर्झा ग्राम पंचायतीचे सरपंच व सदस्य या दाेघांना गडचिराेली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी सरपंचाच्या घरीच करण्यात आली. सरपंच साेनाली गाेकुलदास नागपुरे (३२) व ग्रा. पं. सदस्य अजय भास्कर नागापुरे अशी लाच स्वीकारणाऱ्या आराेपींची नावे आहेत.
तक्रारकर्ते हे धुंडेशिवणी येथील आहेत. त्यांनी अमिर्झा व अमिर्झा टाेली येथील नाल्यांचा उपसा केला. या कामाचे बिल देण्याकरिता सरपंच व सदस्याने पाच हजार रुपयांची मागणी केली. तडजाेडीअंती ४ हजार रुपये देण्याचे ठरले. अजय नागपुरे यांनी लाच स्वीकारली. त्यातील २ हजार ५०० रुपये साेनाली नागापुरे यांना दिले. दाेघांविराेधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिराेलीचे पाेलिस उपअधीक्षक अनिल लाेखंडे यांच्या मार्गदर्शनात पाेलिस निरीक्षक श्रीधर भाेसले, सहायक फाैजदार प्रमाेद ढाेरे, नथ्थू धाेटे, राजेश पद्मगिरवार, किशाेर जाैंजाळकर, श्रीनिवास संगाेजी, संदीप घाेरमाेडे, संदीप उडाण, विद्या म्हशाखेत्री, ज्याेत्सना वसाके, तुळशीराम नवघरे आदींच्या पथकाने केली.