गावाच्या विकासासाठी सरपंच, उपसरपंच मैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:37 AM2021-02-24T04:37:45+5:302021-02-24T04:37:45+5:30
गावाचा विकास करायचा असेल तर केंद्र सरकार व राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधी बरोबर लोकप्रतिनिधींनी मिळणाऱ्या निधीतून गावाचा विकास करणे ...
गावाचा विकास करायचा असेल तर केंद्र सरकार व राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधी बरोबर लोकप्रतिनिधींनी मिळणाऱ्या निधीतून गावाचा विकास करणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत निवडणूक सदस्यांना डावलून तरूणांना गावाच्या विकासात विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात युवकांना संधी मिळाली आहे. गावाच्या विकासासाठी कोणत्या योजनेतून गावाचा विकास करावा यावर तरुण सदस्यांना माहिती घेणे आवश्यक आहे. निवडून आलेल्या सरपंच उपसरपंचांना गावात पूर्णवेळ देणे आवश्यक आहे. आपल्याकडून गावकऱ्यांच्या अपेक्षा असणे स्वाभाविकच आहे.
गावात असलेले रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य व इतर बाबीवर सरपंच व उपसरपंच यांनी लक्ष देऊन विविध बाबीवर लक्ष घालून काम करणे आवश्यक झाले आहे. ग्रामीण भागातील ग्रामस्थांचे लक्ष सरपंच उपसरपंचांकडे लागले आहे.