कृषी निविष्ठांच्या याेग्य वापरामुळे लागवड खर्चात बचत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:33 AM2021-01-22T04:33:14+5:302021-01-22T04:33:14+5:30
गडचिराेली : शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान व यंत्राचा वापर झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वेळेची व श्रमाची बचत हाेत ...
गडचिराेली : शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान व यंत्राचा वापर झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वेळेची व श्रमाची बचत हाेत आहे. विविध बियाणांची लागवड ही पेरणी पद्धतीने केली असता, बियाणे आणि खताचा याेग्य वापर हाेताे. कृषी निविष्ठांच्या याेग्य वापरामुळे लागवड खर्चात बचत हाेते. तसेच पिकाला याेग्य प्रमाणात पाेषणतत्त्व मिळत असल्याने पिकाची वाढ देखील हाेते, असा सल्ला विषय विशेषेज्ज्ञ (कृषी हवामान शास्त्र) नरेश बुद्धावार यांनी दिला.चामाेर्शी तालुक्यातील जयरामपूर येथे बायाेटेक-किसान हब प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांच्या शेतावर कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष भेट देऊन पिकांचे निरीक्षण केले. गडचिराेली जिल्ह्यात जवस पिकाचे क्षेत्र वाढविणे आणि उत्पादनात वाढ घडवून आणण्याच्या दृष्टीने विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने व बायाेटेक-किसान हब प्रकल्पांतर्गत तसेच कृषी विज्ञान केंद्र साेनापूरमार्फत जवस पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. कमी कालावधी व कमी पाण्याचा वापर करून जवसाचे उत्पादन घेता येते. हे पीक आराेग्यासाठी लाभदायक आहे. शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार विविध पिकांच्या वाणांचा अवलंब करावा. तसेच शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून आर्थिक नफा मिळवावा, असे प्रतिपादन नरेश दुधबावरे यांनी केले. दरम्यान जवस वाण एनएल-२६० पिकाच्या लागवड तंत्रााविषयी माहिती देण्यात आली.
याप्रसंगी आत्माचे सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक हेमंत उंदीरवाडे, प्रवीण नामुर्ते व जयरामपूर येथील शेतकरी उपस्थित हाेते.