सावित्रीबाई फुलेंचे विचार अंगिकारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2017 01:27 AM2017-01-04T01:27:04+5:302017-01-04T01:27:04+5:30

सावित्रीबाई फुलेंनी मुलींसाठी सर्वप्रथम शाळा उघडून मुलींसाठी खऱ्या अर्थाने शिक्षणाची दारे उघडी केली.

Savitribai Fulle thought about Angkorra | सावित्रीबाई फुलेंचे विचार अंगिकारा

सावित्रीबाई फुलेंचे विचार अंगिकारा

Next

नगराध्यक्षांचे प्रतिपादन : नगर परिषदेत जयंती साजरी
गडचिरोली : सावित्रीबाई फुलेंनी मुलींसाठी सर्वप्रथम शाळा उघडून मुलींसाठी खऱ्या अर्थाने शिक्षणाची दारे उघडी केली. शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुलेंनी अनेक हालअपेष्टा सहन केल्या आहेत. नागरिकांनी सावित्रीबाई फुलेंचे कार्य सदैव स्मरणात ठेवावे, असे आवाहन नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी केले.
नगर परिषदेमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला नगराध्यक्ष योगीता पिपरे व मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांच्याहस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी नगरसेवक प्रशांत खोब्रागडे, माधुरी खोब्रागडे, अनिल कुनघाडकर, वर्षा नैताम, प्रवीण वाघरे, रितू कोलते, गुलाब मडावी, अनिता विश्रोजवार, लता लाटकर, सतीश विधाते, अल्का रोहणकर, रमेश चौधरी, निता उंदीरवाडे, भूपेश कुळमेथे, मंजूषा आखाडे, आनंद शृंगारपवार, वैष्णवी नैताम, मुक्तेश्वर काटवे, गीता पोटावी, केशव निंबोड, रंजना शंभूविधी गेडाम, संजय मेश्राम, नितीन उंदीरवाडे, पूजा बोबाटे, वर्षा बट्टे उपस्थित होते. न. प. चे कर्मचारी संतोषवार, भीमराव शेंडे, मेश्राम, शेंडे आदी उपस्थित होते.

Web Title: Savitribai Fulle thought about Angkorra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.