निर्बंधाच्या वेळेतही काय हवे ते सांगा, दुकाने बाहेरून बंद, आतून सुरू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 05:00 AM2021-07-23T05:00:00+5:302021-07-23T05:00:38+5:30

आता सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू राहत असल्याने जवळपास तेवढाच वेळ दुकान सुरू ठेवण्यास दुकानदारांना वेळ मिळतो, तसेच ग्राहकांनाही ४ वाजतानंतर दुकाने बंद हाेत असल्याची माहिती असल्याने बहुतांशी ग्राहक ४ वाजतापूर्वीच साहित्य खरेदी करतात. एखादाच ग्राहक ४ वाजतानंतर साहित्य खरेदीसाठी येतो. या ग्राहकाला साहित्य देण्यासाठी नियम ताेडून दुकाने उघडी ठेवली जात आहेत. 

Say what you want even in times of restriction, shops closed from the outside, start from the inside! | निर्बंधाच्या वेळेतही काय हवे ते सांगा, दुकाने बाहेरून बंद, आतून सुरू !

निर्बंधाच्या वेळेतही काय हवे ते सांगा, दुकाने बाहेरून बंद, आतून सुरू !

Next
ठळक मुद्देगडचिराेली शहरातील स्थिती : एकाला बघून दुसरा माेडत आहे नियम

दिगांबर जवादे
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, काही दुकाने ४ वाजतानंतरही सुरू ठेवली जातात. बाहेरून शटर टाकून ठेवले जाते. आतमध्ये मात्र ग्राहक राहत असून ग्राहकांना सामान दिले जाते. 
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी हाेऊ नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी दुकाने सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहत हाेती.
आता सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू राहत असल्याने जवळपास तेवढाच वेळ दुकान सुरू ठेवण्यास दुकानदारांना वेळ मिळतो, तसेच ग्राहकांनाही ४ वाजतानंतर दुकाने बंद हाेत असल्याची माहिती असल्याने बहुतांशी ग्राहक ४ वाजतापूर्वीच साहित्य खरेदी करतात. एखादाच ग्राहक ४ वाजतानंतर साहित्य खरेदीसाठी येतो. या ग्राहकाला साहित्य देण्यासाठी नियम ताेडून दुकाने उघडी ठेवली जात आहेत. 

कारवाई हाेत नसल्याने नियम ताेडण्याचे प्रकार वाढले
निर्बंध माेडणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याची जबाबदारी नगर परिषदेची आहे. सुरुवातीला नगर परिषदेचे पथक फिरून सुरू राहत असलेल्या दुकानांवर कारवाई करीत हाेते. आता मात्र पथकामार्फत कारवाई केली जात नसल्याने दुकानदारांची हिंमत वाढली आहे. एकाला बघून दुसरा दुकानदार सायंकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवत आहेत. ५ वाजेपर्यंत तर सर्वच दुकाने नियम ताेडून सुरू राहतात. 

रात्री ११ वाजेपर्यंत हाॅटेलमध्ये ग्राहकांची रेलचेल
सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांना बसवून सेवा देण्याची मुभा हाॅटेल मालकांना देण्यात आली आहे. ४ वाजतानंतर केवळ पार्सलसेवा द्यायची आहे. मात्र, शहरातील हाॅटेल रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहतात. हाॅटेलमध्येच जेवणाची व्यवस्था केली जाते. जिल्हाधिकाऱ्यांचे नियम हाॅटेल मालकांकडून पूर्णपणे धाब्यावर बसविले जात आहेत. हा अतिशय गंभीर प्रकार आहे. 

दुकानाबाहेर राहताे कामगार
लाेकमत प्रतिनिधीला मुख्य मार्केटमधील एक कापड दुकान अर्धवट शटर टाकलेल्या अवस्थेत दिसून आले. बाहेर असलेल्या कामगाराला दुकान सुरू आहे काय? आपल्याला कपडे घ्यायचे आहेत असे विचारले असता, कामगाराने दुकान सुरू असल्याचे सांगितले. शटर उघडून दुकानात प्रवेश करून काही ग्राहक दुकानामध्ये कपडे खरेदी करीत असल्याचे दिसून आले.

हाॅटेलमध्ये दिवसभर शुकशुकाट
गडचिराेली शहरातील हाॅटेलचा व्यवसाय रात्री ७ ते ११ वाजेपर्यंत याच काळात हाेते. दिवसा फार कमी ग्राहक हाॅटेलमध्ये जातात. केवळ रात्रीच्या व्यवसायाच्या भरवशावर सर्व मदार अवलंबून आहे. त्यामुळे रात्री हाॅटेल सुरू ठेवताना काेराेनाचे नियम हाॅटेल व्यावसायिकांनी पाळणे अपेक्षित आहे.

 

Web Title: Say what you want even in times of restriction, shops closed from the outside, start from the inside!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.