एससी व एसटी शेतकऱ्यांना मिळणार सिंचन साधने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:38 AM2021-09-03T04:38:35+5:302021-09-03T04:38:35+5:30
सिंचन विहिरी करिता २ लाख ५० हजार रुपये, जुनी विहीर दुरुस्ती करिता ५० हजार रुपये, इनवेल बोअर करिता २० ...
सिंचन विहिरी करिता २ लाख ५० हजार रुपये, जुनी विहीर दुरुस्ती करिता ५० हजार रुपये, इनवेल बोअर करिता २० हजार रूपये, विद्युत जोडणी करिता १० हजार रुपये, पंपसंच करिता २० हजार रूपये, सौर कृषी पंप करिता ३० हजार रूपये पर्यंत व सूक्ष्म सिंचनाकरिता ९० टक्के मर्यादेत पूरक अनुदान मिळणार आहे.
योजनेकरिता महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेत लाभ घेण्यासाठी लाभार्थी अनुसूचित जाती, नवबौद्ध व आदिवासी शेतकरी असावा. त्याच्याकडे जमीन धारणेचा सात बारा असावा. लाभार्थ्यांकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी सभापती प्रा. रमेश बारसागडे व कृषी विकास अधिकारी प्रदीप तुमसरे यांनी केले आहे.