अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मिळेल नामांकित शाळेत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:31 AM2021-07-25T04:31:08+5:302021-07-25T04:31:08+5:30
ही योजना विद्यार्थ्यांसाठी निवासी स्वरूपात शिक्षण देणार आहे. या योजनेअंतर्गत त्यांच्या शिक्षणाचा खर्च व राहण्याचा खर्च उचलला जाईल. जिल्हाधिकारी ...
ही योजना विद्यार्थ्यांसाठी निवासी स्वरूपात शिक्षण देणार आहे. या योजनेअंतर्गत त्यांच्या शिक्षणाचा खर्च व राहण्याचा खर्च उचलला जाईल. जिल्हाधिकारी यांच्याद्वारे नामांकित शाळांची निवड केली जाणार आहे. सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय गडचिरोलीद्वारा विद्यार्थी निवडीसाठी अर्ज स्वीकारणे व योजनेची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. पात्र विद्यार्थ्यांनी ३१ जुलैपर्यंत कार्यालयातून अर्ज घ्यावेत. इयत्ता ८ वी व १० वी पास अनुसूचित जातीमधील विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. निवड प्रक्रिया स्पर्धात्मक परीक्षेद्वारा होणार आहे. ट्युशन फी व राहण्यासाठीचा खर्च ९ वी १० वी इयत्तेसाठी रुपये ७५ हजार व ११ वी १२ वी इयत्तेसाठी १.२५ लाख रुपये संबंधित शाळेला दिला जाणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांना नामांकित शाळेतील अभ्यासक्रम व स्थिती लक्षात येण्यासाठी निवड झाल्यानंतर तीन महिने विशेष कोर्स दिला जाणार आहे. यामुळे नवीन ठिकाणी विद्यार्थ्यांना त्या शाळेत अडचणी येणार नाहीत. विशेष बाब म्हणजे विद्यार्थ्यांच्या या योजनेतील शिक्षण कालावधीनंतर पुढील शिक्षणासाठी त्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व टॉप क्लास शिक्षण योजनेत जोडले जाणार आहे.